Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील युवक-युवतींसाठी 'या' देशात नोकरीची मोठी संधी; महिन्याला २ लाख पगार मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:08 IST

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी या देशात रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

इस्रायईमधील नॉनवॉर झोनमध्ये घरगुती काळजीवाहक या क्षेत्रात युवक-युवतींसाठी तब्बल ३,५०० पदांसाठी भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता
◼️ यासाठी इंग्रजी भाषेचे सामान्यज्ञान.
◼️ २५ ते ४५ वर्षे वयोगटांतील उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत.
◼️ उमेदवारांकडे काळजीवाहू सेवांसाठी किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◼️ यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश असावा, तसेच मिडवायफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बीएस्सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे.

व्हिजा आणि पासपोर्ट मार्गदर्शन
◼️ संपूर्ण निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन व मदत विभागामार्फत महाराष्ट्रातच केली जाणार आहे.

दोन लाखांपर्यंत वेतन
◼️ निवड झालेल्या उमेदवारांना इस्राईलमध्ये २१४०.९५ अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे १ लाख ९९ हजार ७७० रुपये इतके मासिक वेतन मिळणार आहे.
◼️ मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे.

कुठे कराल अर्ज?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.

अधिक वाचा: गावागावांत एकच चर्चा शक्तिपीठ जाणार कसा? अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांच्या जिवाला लागलाय घोर

टॅग्स :इस्रायलनोकरीपासपोर्टभारतव्हिसावैद्यकीय