Join us

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: लाभ घ्या.... फळबागेसाठी मिळतेय अनुदान वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:54 IST

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आठ फळपिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

अकोला : शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत (Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana) आंबा, पेरू, संत्रा, कागदी लिंबू, मोसंबी, सीताफळ, आवळा, डाळिंब आदी फळपीक लागवडीचा (Cultivation) समावेश आहे. त्यात भरघोस अनुदान उपलब्ध असून, वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो.

योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक आहे. संकेतस्थळावर पूर्वसंमतीसाठी घटकांतर्गत लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.योजनेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने सुरु झालेल्या या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणेकरिता नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पध्दतीने https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावेत.

या योजनेंतर्गत फळपिकाला तीन वर्षात अनुक्रमे ५०, ३० व २० याप्रमाणे अनुदान वाटप होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

कोणत्या पिकासाठी किती अनुदान?

आंबा७१,९९७
पेरू७७,६९२
संत्रा-मोसंबी८९,२७५
कागदी लिंबू७२,६५५
आवळा६३,६४०
सीताफळ९१,२५१
डाळिंब१,२६,३२१

हे ही वाचा सविस्तर :  'CCRI' : 'सीसीआरआय'चे क्रांतिकारी पाऊल शेतकऱ्यांना फायदेशीर कसे ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेसरकारी योजनाकृषी योजनाशेतकरीशेती