lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु

खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु

Beginning of Kharipa preparations; Fertilizer, seed planning started | खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु

खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु

ग्रामीण भागातील शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतला आहे. नांगरणीसह खते, बी-बियाण्यांचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतला आहे. नांगरणीसह खते, बी-बियाण्यांचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सलीम सय्यद

दिवसेंदिवस वाढत्या उष्म्यामुळे शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. शहरी भागात राजकीय वातावरण हळूहळू जोर धरू लागले असताना दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या कामात गुंतला आहे. नांगरणीसह खते, बी-बियाण्यांचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शेतजमिनीची मशागत शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. शेतकरी शेतीची मशागत करण्यात गुंतला असल्याचे चित्र सध्या शहरासह ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे. उन्हाच्या वाढत्या झळा सहन करत शेतकरी आता खरिपाच्या तयारीला लागले आहेत. उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून पेरणीसाठी जमीन तयार करून ठेवण्याचे काम अहमदपूर तालुक्यात सुरू आहे. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती-मशागतीची कामे करत असल्याने बैलजोडी आता कालबाह्य होत चालली आहे. जवळपास दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. जास्तीची मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने यांत्रिक शेतीकडे कल वाढत चालला आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीत अंगमेहनतीची कामे करण्यासाठी मजुरांचा नकार वाढत असल्याने शेती अडचणीत सापडली आहे.

पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती केवळ मजुरांच्या तुटवड्यामुळे बदलत चालली आहे. बैलजोडीने होणारी नांगरणीनंतरची मशागतही आता यंत्राच्या साह्याने केली जात असल्याने शेतकऱ्यांचीही सोय झाली आहे. पैसे देऊनही मजूर कामावर येण्यासाठी नकार देत आहेत. त्यातच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिवाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शेतीत

काम करणे नकोसे वाटत आहे. विशेषतः नांगरणे, मोगडणे, शेतातील ढेकळे फोडणे, खोलगट, उंच असलेल्या जमिनीचे सपाटीकरण करणे, झाडांची खोडे काढणे आदी कामे सध्या केली जात आहेत. या कामांना टॅक्टरची मदत घेतली जात असल्याचे चित्र आहे.

उन्हामुळे बदलली कामाची वेळ

* दिवसभर कडाक्याचे ऊन पडत असल्याने शेतीच्या कामांना भल्या पहाटेच सुरुवात करण्यात येत आहे. दुपारी विश्रांती आणि ऊन उतरल्यावर पुन्हा रात्री उशिरापर्यंत कामे होत आहेत.

* मजूरही कामावर येताना सकाळी लवकर येत असून, दुपारच्यावेळी विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे. अहमदपूर तालुक्यात तापमानाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात शेतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहेत.

७२ हजार हेक्टर खरीप क्षेत्र

अहमदपूर तालुक्यात सर्वसाधारण ७२ हजार हेक्टर खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. ४ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी, बाजरी, मका हे तृणधान्य घेतले जाते. १४ हजार ५१३ हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, उडीद ही कडधान्य घेतली जातात.

तर ४० हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तीळ, भुईमूग, सूर्यफुल ही पिके घेतली जातात. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४० हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर केवळ सोयाबीन घेतले जाते. ५ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते.

Web Title: Beginning of Kharipa preparations; Fertilizer, seed planning started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.