Join us

Ayushman Bharat Yojana : शेतकऱ्यांनो! 'आयुष्मान कार्ड' काढले का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:11 IST

Ayushman Bharat Yojana : आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.

Ayushman Bharat Yojana : आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. 

देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. शासनाच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत १३५६ आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध असून, याकरिता वाशिम जिल्ह्यातील ११ लाख ५८ हजार ९५७ पैकी ५ लाख ५ हजार लाभार्थीनी 'आयुष्मान कार्ड' (ayushman card) काढले आहे.

आयुष्मान कार्ड (ayushman card) नसल्यास मोफत वैद्यकीय उपचार घेण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत योजना) राबविली जात आहे.

या योजनेंतर्गत १३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्व्हेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात या योजनेसाठी ११ लाख ५८ हजार ९५७ लाभार्थी पात्र ठरले आहे. १८ मार्च पर्यंत ५ लाख ५ हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे.

कोठे काढणार कार्ड?

सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून कार्ड काढता येते. स्वतःच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला द्यावा. म्हणजेच ई-कार्ड त्वरीत तयार होईल.

कागदपत्रे काय लागतात?

ई-कार्ड काढण्यासाठी आयुष्मान भारत पत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड हे कागदपत्र अनिवार्य आहेत.

पीएम-जेएवाय अंतर्गत या गंभीर आजारावर विमा कव्हर होतो

यात कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, यकृताचे आजार, श्वसनाचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार, मानसिक आजार, जळलेल्या जखमा, नवजात मुलांचे आजार, जन्मजात विकार, संसर्गजन्य रोग (जसे की क्षयरोग आणि मलेरिया), डेकेअर प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया आदींसह जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण १३५६ आजारांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना मोफत आरोग्य उपचार घेणे सुलभ झाले आहे.

पाच लाख आयुष्मान कार्डचे वाटप

जिल्ह्यातील पाच लाख नागरिकांना आयुष्मान कार्डचे वाटप केले आहे. ऑनलाईन पद्धतीने आयुष्मान कार्ड काढता येते.

उद्दिष्ट ११ लाख कार्डाचे

जिल्ह्यातील ११ लाख ५८ हजार ९५७नागरिकांचा समावेश जनआरोग्य योजनेत झालेला आहे. या नागरिकांना आयुष्मान कार्ड काढले आवश्यक आहे.

आतापर्यंत ५ लाख ५ हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. लाभार्थ्यांना आपले सरकार केंद्र किंवा 'सीएससी' सेंटरवरूनदेखील ई कार्ड मोफत काढून घेता येणार आहे. - डॉ. रणजित सरनाईक, जिल्हा समन्वयक, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Wages: 'रोहयो'च्या मजुरीत यंदा तरी होणार का वाढ? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रआयुष्मान भारतसरकारी योजनाआरोग्यशेतकरीशेती