Awakali Paus : वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत, तर काही ठिकाणी झाडे पूर्णपणे वाकलेली आहेत. त्याचबरोबरच मका, कांदा, उन्हाळी ज्वारी यांसह आंबा व इतर फळबागांचेही नुकसान झाले. (Stormy winds)
गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव व संग्रामपूर परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Stormy winds)
शेकडो एकरांवरील केळीची झाडे उन्मळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असून, हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात थैमानः विद्युत तारा तुटल्याने पुरवठा खंडित, झाडे उन्मळून घरांवर कोसळली, पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गावातील राजू धुंदळे यांच्या घराशेजारील आंब्याचे झाड वादळामुळे उन्मळून त्यांच्या घराच्या छतावर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. (Stormy winds)
मे महिन्याच्या उकाड्यात नागरिक आधीच त्रस्त असतानाच, मागील आठवड्यात तांत्रिक कारणामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. त्यातच मंगळवारी आलेल्या वादळामुळे वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा रात्रभर बंद होता. (Stormy winds)
उकाड्यामुळे लहान मुले, वृद्ध व रुग्णांना विशेषतः त्रास सहन करावा लागला. या वादळामुळे शेतीपिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मका, कांदा, उन्हाळी ज्वारी यांसह आंबा व इतर फळबागांचेही नुकसान झाले. अनेक शेतांतील उभ्या पिकांवर वादळी वाऱ्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त क्षेत्रात तातडीने पंचनामे करून शासकीय मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Stormy winds)
वादळी वाऱ्यामुळे अनिता काळपांडे, कासाबाई ढगे, नारायण आकोटकर, मोतीराम कपले, सविता काळपांडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले आहे. तर बातनब्बीर येथील विजय काळपांडे यांच्या तीन एकरांवरील केळी पीक वादळात नष्ट झाले आहे. (Stormy winds)
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाठी यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी करण्यात केली आहे.झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी अद्याप केली आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
केळीच्या झाडांप्रमाणे आमच्या आशाही कोसळल्या आहेत. शासनाने जर लवकर मदत केली नाही, तर आम्ही उद्ध्वस्त होऊ अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक कापणीच्या अंतिम टप्प्यात होते. अशा वेळी आलेल्या या संकटामुळे त्यांना आर्थिक फटका बसला असून, बँक कर्ज, खत बी-बियाण्याचे पैसे फेडण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकऱ्यांची स्थिती अधिकच बिकट होणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने 'ही' पिके झाली जमीनदोस्त वाचा सविस्तर