Join us

Avkali Paus: शेतकऱ्यांना अवकाळीची धास्ती; वातावरणातील बदलाची चिंता वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:57 IST

Avkali Paus : मागील ३ ते ४ दिवसांपासून अवकाळीचे सावट (unseasonal rains) आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता भितीमुळे शेतातील पिके काढणीस वेग आला आहे.

Avkali Paus :  मागील ३ ते ४ दिवसांपासून अवकाळीचे सावट (unseasonal rains) आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता भितीमुळे शेतातील पिके काढणीस वेग आला आहे. 

यावर्षी वरुणराजाची पुरेशी कृपादृष्टी लाभली, त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा आहे. परिणामी रब्बी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शेतांमध्ये मका, बाजरी, ज्वारी व गहू आदी पिके उभी असताना मागील ३ ते ४ दिवसांपासून अवकाळीचे सावट (unseasonal rains) आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसात पाऊस (Rain) पडणार, असा अंदाज वर्तविला असल्यामुळे हाती आलेली पिके घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. (unseasonal rains)

पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मका, ज्वारी, बाजरी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी असल्यामुळे गुरांचा चारा मोठ्या प्रमाणात आहे, परंतु पावसाचा अंदाज असल्यामुळे व पाऊस असल्यास शेतात कापणी करून पडलेला चारा खराब होईल. (unseasonal rains)

पावसाच्या अंदाजामुळे सर्वच शेतकरी पिकांची कापणी व मळणी करण्यासाठी धावपळ करीत असल्यामुळे मजूर मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बाहेरून मजूर आणून शेतीची कामे उरकताना शेतकरी दिसत आहेत.

हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती

* रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी तसेच उन्हाळी कांदा काढणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके कापणी करून पडली आहेत. तर काही मळणी करून पडली आहेत.

* अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. अनेक संकटांतून पिके वाचवत शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येण्याच्या तयारीत असताना, अचानक पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.

* पावसासह वादळ आले तर हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे तयार झालेली पिके घरात आणण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत.

* रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी तसेच उन्हाळी कांदा काढणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके कापणी करून पडली आहेत. तर काही मळणी करून पडली आहेत. अवकाळीचे सावट आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आर्थिक नुकसानाची भिती

कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून आकाशात अवकाळीच्या सावटाचे ढगांची गर्दी दिसून येत आहे. जर बेमोसमी पाऊस झाला, तर रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

अवकाळी पावसाचे संकट आले उंबरठ्यावर

यंदा रब्बी पिकांसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असताना, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अवकाळीचे संकट उंबरठ्यावर आलेले दिसत आहे. जर खरोखर अवकाळी पाऊस झाला, तर रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. आधीच खरीप हंगामात होरपळलेला शेतकऱ्यांची 'आधीच उल्हास मग फाल्गुन मास' अशी अवस्था निर्माण होणार आहे. - गणेश जाधव, शेतकरी, सिद्धपूर

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : अवकाळी पावसात पिकांची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजशेतकरीशेती