lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत

कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत

As many as 952 vacancies to be filled for the post of Agricultural Sevak, application deadline... | कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत

कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत

राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून कृषी सेवक पदासाठी तब्बल ९५२  जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून कृषी सेवक पदासाठी तब्बल ९५२  जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून कृषी सेवक पदासाठी तब्बल ९५२  जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात असून छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे, ठाणे या विभागांमध्ये भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदे?

औरंगाबाद- १९६
लातूर-१७०
नाशिक- ३३६
कोल्हापूर-२५०
अमरावती- १५६
नागपूर- ३६५
पुणे- १८२
ठाणे -२४७

किती मिळणार वेतन?

कृषी विभागातील कृषी सेवकाच्या पदांसाठी प्रति महिना 16 हजार रुपये निश्चित वेतन जाहीर करण्यात आले आहे.

शैक्षणिक अर्हता व अनुभव 

  • पात्र अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदविका किंवा पदवी असणे आवश्यक
  • निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल. काम समाधानकारक असेल तर पुढील दोन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात येणार असून कृषी सेवक पदी नियुक्तीचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी तीन वर्षांचा असेल.


कसा व कुठे कराल अर्ज?

पात्र उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतरच अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Web Title: As many as 952 vacancies to be filled for the post of Agricultural Sevak, application deadline...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.