Join us

राज्यात अजून या १० गावांत 'मधाचे गाव' ही योजना राबविण्यासाठी मान्यता; शासन निर्णय आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:54 IST

Madhache Gav राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिक साधन संपत्ती व मुबलक फुलोरा असणाऱ्या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिक साधन संपत्ती व मुबलक फुलोरा असणाऱ्या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

तसेच मध आणि मधामाशांपासून तयार होणारी उत्पादने यांची साखळी प्रक्रिया व विक्री व्यवस्था करणे, या माध्यमातून मधुपर्यटन करणे याकरीता "मधाचे गाव" ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार१) घोलवड, ता. डहाणु, जि.पालघर२) भंडारवाडी, ता. किनवट, जि. नांदेड३) बोरझर, ता. नवापुर, जि. नंदुरबार४) काकडदाभा, ता. औढानागनाथ, जि. हिंगोली५) चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक६) उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर७) शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी८) सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा९) सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा१०) आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती

वरील १० गांवात मधाचे गाव ही योजना राबविण्यासाठी एकूण रु.५,०१,९७,०००/- (अक्षरी रुपये पाच कोटी, एक लाख, सत्याण्णव हजार मात्र) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

कोणत्या गावाला किती निधी मंजूर?

अ.क्रगावाचे नावमंजूर करण्यात आलेला निधी (रुपये लाखात)
घोलवड, ता. डहाणू, जि. पालघर५४
भंडारवाडी, ता. किनवट, जि. नांदेड५३
बोरझर, ता. नवापुर, जि. नंदुरबार४८
काकडदाभा, ता. ओढानागनाथ, जि. हिंगोली४९
चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक४०.२२
उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर४६.७५
शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी५४
सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा५४
सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा४९
१०आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती५४
 एकूण५०१.९७

अधिक वाचा: शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी; ७० वर्षाचे शेतकरी विष्णुपंत यांनी १२ एकरवर फुलवली फळपिकांची शेती

टॅग्स :महाराष्ट्रजंगलफुलंतालुकाराज्य सरकारसरकारशासन निर्णयखादी