Join us

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प प्रस्तावास मान्यता; प्रति हेक्टरी ६० हजार रुपये मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 1:24 PM

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY DPR based Stream) या योजनेतंर्गत बुबनाळ-ओरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, कुटवाड- हसूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावांतील क्षारपड जमिनीची सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून सुधारणा करण्याच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एकूण १०,००० हेक्टर पानथळ-क्षारपड जमिनीपैकी शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, बुबनाळ ओरवाड, कुटवाड-हसूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या ७ गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीव्दारे सुमारे १९१० हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा करणे.

याबाबतचा रु. ५९.४५ कोटी प्रकल्प किंमतीचा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, लि. शिरोळ यांचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजुरीस्तव सादर केला होता. राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने सदर प्रस्तावास केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. 

केंद्र शासनाने समस्याग्रस्त जमीन सुधारणा या उपयोजनेअंतर्गत निधी वितरण बंद केल्याचे कळविले आहे. दि. ०१-११-२०२३ च्या संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये सदर योजना बंद झाल्याचे कळविण्यात आले होते.

त्यानंतर नवीन मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (३९४ हेक्टर), अर्जुनवाड (३६६.७३ हेक्टर), कवठेसार (१३० हेक्टर), गणेशवाडी (२३४ हेक्टर), कुटवाड (८५.४७ हेक्टर), घालवाड (१७७.८० हेक्टर) व औरवाड (१५७ हेक्टर) ता. शिरोळ या गावांतील एकूण १५४५ हेक्टर क्षेत्र यात समविष्ट करण्यात आले आहे.

सच्छिद्र निचरा प्रणालीचा (Sub-Surface Drainage System) वापर करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबविण्याकरिता ₹ ९४५.५४ लक्ष अंदाजपत्रकीय खर्चाचा प्रकल्प राबविण्यास आणि त्याकरिता या प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (RKVY DPR based Stream) या उपयोजने अंतर्गत प्रती हेक्टरी ६०,०००/- अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी राबवावयाच्या प्रकल्पांतर्गत घटक/उपचाराचा आराखडा खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे राहील, सदर आराखडयातील अनु. क्र. १, २ व ३ या घटकांची शेतकऱ्यांनी स्व-निधीतून अंमलबजावणी करावयाची असून अनु.क्र. ४ येथील सच्छिद्र निचरा प्रणाली या घटकाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत समस्याग्रस्त जमीन सुधारणा कार्यक्रम (RKVY DPR based Stream) या योजने अंतर्गत प्रती हेक्टरी ६०,०००/- अर्थसहाय्य लाभार्थी शेतकऱ्यांना अनुज्ञेय राहील.

या प्रकल्पाचा आराखडा व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अर्थसहाय्य व लाभार्थी हिस्सा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शिरोळ तालुका क्षारपडमुक्त करण्याचा निर्धार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शासनाकडून मान्यता मिळाल्यामुळे क्षारपडमुक्त्तीच्या दत्त पॅटर्नला आणखी बळ मिळणार आहे. - गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त उद्योग समूह, शिरोळ

टॅग्स :शेतकरीराज्य सरकारसरकारशिरोळसाखर कारखानेकोल्हापूरशेती