कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अंतिम अंदाजानुसार, तेलबिया लागवडीखालील क्षेत्रात २०२३-२४ मधील ३०१.९२ लाख हेक्टरच्या तुलनेत वाढ होऊन २०२४-२५ मध्ये ते ३०४.४० लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
यासोबतच तेलबियांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली असून, २०२३-२४ मधील ३९६.६९ लाख टनांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये उत्पादन ४२९.८९ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे.
देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या (आत्मनिर्भर भारत) दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियानाला मंजूरी दिली गेली होती.
याअंतर्गत शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा, बाजारातील चढ उतारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे.
तसेच खाद्यतेलाच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी किमान आधारभूत किंमत आणि आयात शुल्काची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) या योजनेअंतर्गत केली जाणारी खरेदी तेलबियांसाठी देखील लागू असून, यामुळे शेतकऱ्यांना उत्तम भाव आणि उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
Web Summary : India's oilseed production and cultivated area have increased significantly. Production rose to 429.89 lakh tonnes in 2024-25. The National Food Oil-Oilseed Mission aims for self-reliance, supporting farmers with fair prices and reduced import dependence through effective implementation of minimum support price.
Web Summary : भारत में तिलहन उत्पादन और खेती क्षेत्र में उल्लेखनीय वृद्धि हुई है। 2024-25 में उत्पादन 429.89 लाख टन तक पहुंच गया। राष्ट्रीय खाद्य तेल-तिलहन मिशन का उद्देश्य आत्मनिर्भरता है, जो किसानों को उचित मूल्य और न्यूनतम समर्थन मूल्य के प्रभावी कार्यान्वयन के माध्यम से आयात निर्भरता को कम करने में सहायता करता है।