Join us

Alibaug White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:12 IST

अलिबागच्या गुणकारी पांढऱ्या कांद्याला बाजारात विशेष मागणी आहे. त्यामुळेच त्याला GI भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

राजेश भोस्तेकरअलिबाग: अलिबागच्या गुणकारी पांढऱ्या कांद्याला बाजारात विशेष मागणी आहे. त्यामुळेच त्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. आता या वैशिष्ठापूर्ण पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.

त्यानुसार जनजागृती मोहीम सुरू सुरू केली असून, भविष्यात या पांढरे सोने म्हणून परिचित असलेल्या कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

पांढरा कांदा हा अलिबागची वेगळी ओळख असणारे पीक समजले जाते. खंडाळे, नेहुली, वेश्वी, कार्ले, पवेळे, रुळे, सागाव, धोलपाडा या परिसरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

पूर्वी २६० हेक्टरवर लागवड होती. हळूहळू हे क्षेत्र घटून अडीचशे हेक्टरवर आले. त्यामुळे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेल्या या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोठी बाजारपेठ उपलब्ध होणारअलिबागमध्ये पर्यटनाला येणारे पर्यटक हे आवर्जून पांढरा कांदा खरेदी करतात, वर्षाला पाच हजार टन उत्पादन तालुक्यातील सात ते आठ गावांतील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याला भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने मोठी बाजारपेठ मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उत्पादन वाढणे आवश्यक आहे. यासाठी आता जिल्हा प्रशासन, कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार• जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पांढऱ्या कांद्याच्या क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बीजोत्पादन करण्याचा प्रथल कृषी विभागातर्फे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.• १३ ऑगस्ट रोजी खंडाळा मंदिर येथे येथील साई महसूल पंधरवड्यानिमित्त अलिबागचा पांढरा कांदा बीजोत्पादन व क्षेत्र विस्तार पीक पद्धती व फलोत्पादन या विषयावर शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम पार पडला.डॉ. जितेंद्र कदम यांनी पांढरा कांदा लागवड बीज उत्पादन व भौगोलिक मानांकन अर्ज करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास वानखेडे होते. प्रकल्प उपसंचालक सतीश बोऱ्हाडे, कांदा उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.

टॅग्स :कांदाअलिबागअलिबागपीकशेतकरीशेतीबाजार