Join us

Alcohol Production : उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 14:51 IST

उसाचा रस आणि बी हेवी वे मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी ने उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.

उसाचा रस आणि बी हेवी वे मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी ने उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.

देशात साखरेचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता म्हणून १५ डिसेंबर न २०२३ रोजी केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे उसाचा रस आणि बी हेवी न मोलॅसिसपासून रेक्टिफाईड स्पिरिट, न इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल न अल्कोहोल निर्मितीवर बंदी घातली होती. यातील इथेनॉल निर्मिती वरील बंदी काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने २०२४-२५च्या हंगामाकरिता उठविली होती.

अल्कोहोल आणि रेक्टिफाईड स्पिरीटवरील बंदीही उठवावी अशी साखर उद्योगाची मागणी होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने येत्या हंगामासाठी ही बंदी उठविणारा आदेश जारी केला आहे. आगामी हंगामात साखरेचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे.

साखरेचा विक्री दर वाढवावा

साखरेचा किमान विक्री दर 3100 रुपये प्रतिक्चिटल आहे. तो वाढवून ४२०० रुपये करावा अशी मागणी साखर कारखानदारांकडून गेल्या दोन-तीन वर्षापासून होत आहे. केंद्र सरकारने ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही. साखरेचा विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

अल्कोहोल हे केमिकल उत्पादने, देशी दारूचे उत्पादन तसेच फॉरेन लिकरसाठी उपयोगी असल्याने त्यासाठीची बाजारपेठ कारखान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यास मदत होणार आहे. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेती क्षेत्रसरकारमहाराष्ट्र