Join us

Agro Forestry : मिश्रफळबाग किंवा वनशेतीचा माती संवर्धनासाठी किती फायदा? किती मिळते उत्पन्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:50 IST

मिश्र फळबागांमुळे मातीमध्ये असलेले अन्नघटक सर्व पिकांना समप्रमाणात मिळण्यास मदत होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो.

Agro Forestry :  अलिकडच्या काळात अनेक शेतकरी मिश्र फळबाग किंवा वनशेतीचा पर्याय निवडू लागले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे अनुभव असून मातीचे संवर्धन होण्यासही मदत होत असल्याचं समोर आलं आहे. पण मिश्रफळबाग किंवा वनशेतीचा शेतीला नेमकं किती फायदा होतो?

एकाच वेळी शेतामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक फळपिके लागवड करणे आणि त्यामध्ये विविध पिके आंतरपीक म्हणून लागवड करणे याच प्रक्रियेला मिश्रफळबाग लागवड असं म्हणतात. यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या मातीमध्ये असलेले अन्नघटक विविध पिकांना मिळण्यास मदत होते. त्याबरोबरच विविध पिकांची एकाच वेळी लागवड केल्यामुळे कीडनियंत्रण करण्यास मदत होते. 

दरम्यान, फळबागांमध्ये काही वनस्पती एकमेकांच्या वाढीसाठी पूरक असतात. त्याबरोबरच या मॉडेलमध्ये कोणते झाड कुठे लावावे याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. कुंपन म्हणून कोणते, संरक्षण म्हणून कोणते, परागीभवानासाठी कोणते, उत्पादनासाठी किती व कोणते झाडे या सर्व पिकांचा विचार करून मिश्र फळशेती करावी लागले.

वनशेतीअलीकडच्या काळात कोरडवाहू शेतामध्ये काही शेतकरी बांबू, चंदन, साग, महोगणी अशा प्रकारच्या दीर्घकाळ चालणाऱ्या झाडांची लागवड करत आहेत. वनशेती करत असताना जास्त खतांचा वापर होत नसल्यामुळे मातीचे संवर्धन होण्यास मदत होते. 

आंतरपिकेवनशेती किंवा मिश्रफळशेती करत असताना आंतरपिकांची लागवड करता येते. तीन महिन्यात, चार महिन्यात किंवा सहा महिन्यात येणाऱ्या पिकांचा लागवड आंतरपिक म्हणून करता येते. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, गहू या पिकांचा सामावेश करता येऊ शकतो.

उत्पन्नमिश्र फळशेतीमध्ये तीन ते चार पिकांचा अंतर्भाव असल्यामुळे एकाच वेळी सर्व पिकांचे उत्पन्न येत नाही. यासोबतच प्रत्येक मालाला चांगला दर मिळत नाही. एकाच शेतातून तीन ते चार प्रकारचा शेतमाल उत्पादित होत असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या मालाला चांगला दर मिळतो आणि उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीजंगल