Join us

Agro Advisory: हवामानानुसार भाजीपाला पिकांसाठी दिलाय कृषी सल्ला; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:08 IST

Agro Advisory: सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केला आहे. त्या विषयी जाणून घ्या सविस्तर.

सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केला आहे. त्या विषयी जाणून घ्या सविस्तर.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २३ व २४ फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तर भागात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २३ व २४ फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तर भागात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पाऊस सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

गहू : गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर ८० ते ८५ दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १०% ईसी १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५% ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड १ भाग + गुळ १ भाग + ५० भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.

मका : मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए १५ पीपीएम ची फवारणी करावी. द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे व गादी वाफ्यावरील रोपांना ३० दिवस झाले असल्यास पुर्नलागवड करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांचा घरी खुराक तयार करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून ३३% पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी घ्यावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Farming: जानोरीचा गहू देतोय एकरी ७ क्विंटल उत्पादन; कसे ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन