Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी (मुगाव) मध्ये ‘शेती दिन’ कार्यक्रम संपन्न; तज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:23 IST

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेती दिन’ तसेच कापूस उत्पादन व बाजारपेठेसंबंधी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत टाकळी (मुगाव) येथे करण्यात आले होते.

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी (जि. नांदेड) आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेती दिन’ तसेच कापूस उत्पादन व बाजारपेठेसंबंधी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत टाकळी (मुगाव) येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा उद्देश सुधारित कापूस उत्पादन तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि शेतीतील आव्हानांना वैज्ञानिक पद्धतीने कसे सामोरे जावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा होता. यावेळी मरवाळी सरपंच कुरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

तसेच कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील पशूवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. निहाल मुल्ला यांनी सध्याच्या कुक्कुट पालनातील रोग व त्यांचा प्रसार, वेळीच घ्यावयाची काळजी याबदल सविस्तर मार्गदर्शन करत  शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

तर विशेष कापूस प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. के. जी अंभुरे यांनी तांत्रिक सत्राचे मार्गदर्शन केले. त्यांनी ‘सघन लागवड’ (Closer Spacing) तंत्र, कीड-रोग व्यवस्थापन आणि पिकाचे नियमित निरीक्षण याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. 

या शेती दिन कार्यक्रमामुळे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्यात फलदायी संवाद साधला गेला. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती, बाजारपेठेचे मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि नफ्यात वाढ करण्यास या कार्यक्रमाने मोलाचे योगदान दिले.

हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Farmers Day’ at Takli (Mugav): Expert Guidance on Various Subjects

Web Summary : Agriculture Day at Takli (Mugav) focused on improved cotton production, market opportunities, and scientific solutions for farming challenges. Experts guided farmers on poultry diseases, intensive farming techniques, pest management, and crop monitoring, fostering farmer-scientist interaction and aiming for increased production and profits.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसनांदेडमराठवाडा