Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

Additional charge of the Agricultural Council to Agriculture Commissioner Dr. Suraj Mandhare. | MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

MCAER : कृषी परिषदेचा अतिरिक्त कार्यभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे

कृषी परिषदेचे सदस्य सचिव असलेले रावसाहेब भागडे यांना याआधी बऱ्याचदा प्रभारी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण आता याच पदाचा कार्यभार कृषी आयुक्तांना देण्यात आला आहे.

कृषी परिषदेचे सदस्य सचिव असलेले रावसाहेब भागडे यांना याआधी बऱ्याचदा प्रभारी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण आता याच पदाचा कार्यभार कृषी आयुक्तांना देण्यात आला आहे.

Pune : महाराष्ट्र राज्याच्या सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी महाविद्यालयांचे नेतृत्व करणाऱ्या कृषी शिक्षण व परिषदेचे महासंचालक असलेले रावसाहेब भागडे हे आज वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांच्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे देण्यात आला आहे. सूरज मांढरे यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून राज्याच्या कृषी आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला होता. 

दरम्यान, कृषी परिषदेचे सदस्य सचिव असलेले रावसाहेब भागडे यांना याआधी बऱ्याचदा प्रभारी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण आता याच पदाचा कार्यभार कृषी आयुक्तांना देण्यात आला आहे.

रावसाहेब भागडे हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्यातील टाकळी राजाराय या गावातील शेतकरू कुटुंबातील असून ते १९९४ साली शासकीय सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर ते २००९ साली भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस म्हणून दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महसूल व कृषी संलग्न विभागामध्ये बहुतांश काम केले आहे. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक पदाशिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदीसुद्धा चांगले कामकाज केले आहे. शासन सेवा व प्रशासन सेवेतून ते आता वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. 

Web Title: Additional charge of the Agricultural Council to Agriculture Commissioner Dr. Suraj Mandhare.