बदनापूर (जि. जालना) : भा.कृ.अ.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अ.प.- अटारी, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत सघन, अतिसघन व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानावर किसान मेळाव्याचे गुरुवारी (दि.२६) आयोजन दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून मा. कुलगुरू व.ना.म.कृ.वि. परभणी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून संचालक, विस्तार शिक्षण, व.ना.म.कृ.वि. परभणी डॉ. आर.डी. अहिरे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, कृषि महाविद्यालय, बदनापूर डॉ. डी. के. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना जी. आर. कापसे, प्रकल्प संचालक (आत्मा) जालना ए. के. अगवान, तालुका कृषी अधिकारी भोकरदन व जाफ्राबाद ए. एस. शिंदे, तालुका कृषी अधिकारी अंबड बी. आर. गंडे, तालुका कृषी अधिकारी बदनापूर जी. एम. गुजर, सदस्य पंचायत समिती बदनापूर हरिश्चंद बाबा शिंदे तसेच सरपंच वरुडी (ता. बदनापूर) राधाकिशन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक विशेष कापूस प्रकल्पचे नोडल अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले. तर विनीत म्हणून प्रगतशील शेतकरी वरुडी (ता. बदनापूर) जयकिसन शिंदे व उपसरपंच वरुडी विष्णू शिंदे यांच्यासह कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून कापूस पिकात सघन, अतिसघन व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या निवडक प्रगतशील शेतकरी बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यामध्ये शेषराव किसन सुसर, विनोद मारोती सुसर, चंद्रकांत विठ्ठल गावंडे (कोळेगाव, ता. भोकरदन), विष्णु गुलाबराव चव्हाण (निमखेडा, ता. जाफ्राबाद), जयराम गोविंद लाखे, रामनाथ माणिकराव काळे, शौकत महमद शेख (बाजार वाहेगाव, ता. बदनापूर), विजय साहेबराव शेळके, सचिन भगवानराव घाडगे (वाल्हा), विकी सुधीर श्रीसुंदर, बळीराम ज्ञानदेव गायकवाड, मच्छिंद्र भानुदास शिंदे (वरुडी).
तसेच मनोज राजेंद्र मुंजाळ, योगेश्वर ज्ञानेश्वर राऊत (मार्डी, ता. अंबड), सोमिनाथ सुधाकर अवघड, कृष्णा सुदामराव कन्हेरे, एकनाथ पिराजी दाभाडे, ज्ञानेश्वर साहेबराव बारगजे, ठकुबाई गजानन खंडेभराड, कृष्णा बाबुराव एखंडे, दिलीप संपतराव निकस, पंडितराव रंगनाथ टेपले, शिवाजी येडूबा भडांगे, संतोष भाऊसाहेब वरकड, नामदेव साहेबराव शेळके, सुदामराव केशवराव दाभाडे, अण्णासाहेब रंगनाथ तांबे, बाबुराव पुंडलिक मात्रे, प्रल्हादराव नारायण चव्हाण व राजेंद्र राधाकिसन जऱ्हाड यांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक समृद्धी साधावी, असे आवाहन केले. तर मा. संचालक, विस्तार शिक्षण डॉ. आर.डी. अहिरे यांनी या तंत्रज्ञानाच्या त्रिसूत्री बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करत, मराठवाड्यासाठी शिफारसीत दर्जेदार तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर डॉ. सचिन धांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप-प्रकल्प अन्वेषक, विशेष कापूस प्रकल्प डॉ. आर. एल. कदम, यंग प्रोफेशनल अजित डाके, अभिलाष बनसोडे व अमोल दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शेतकरी मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.