जालना : शासनाने विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी संलग्न (Aadhaar Seeding) असणे आवश्यक आहे.
निराधार लाभार्थ्यांसाठी सरकार योजना राबवत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट लाभ मिळण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचा बँक तपशील व आधार केवायसी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे; परंतु जालना जिल्ह्यात योजनेचे १ लाख ३० हजार २०५ लाभार्थी आहेत.
योजनेतील २७ हजार ३१२ लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे या लाभार्थ्यांना सरकारचे आधार नको असल्याचे दिसून येत आहे. योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे (DBT) करण्यात येत आहे. नियमित अनुदान मिळविण्यासाठी निराधारांचे आधार अपडेट व बँक खाते आधार संलग्न असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्यात येत आहे. योजनेचा लाभघेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'आधार' लिंक नाही
जिल्ह्यात निराधार योजनेचे १ लाख ३० हजार २०५ लाभार्थी आहेत. यापैकी २७हजार ३१२ लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे, तर ६७ हजार १७४ लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली.
८८ टक्के लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण
जालना जिल्ह्यातील निराधार योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी ८८ टक्के लाभार्थ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
लाभार्थ्यांना आवाहन
* निराधार योजनेचे अनुदान १ आता 'डीबीटी' मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात देण्यात आले आहे.
* योजनेतील लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाइल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले आहे.
'हे' नक्की करा
* वेबसाईट ओपन करा https://myaadhaar.uidai.gov.in
* Login वर क्लिक करा
* आपला आधार क्रमांक टाका.
* कॅप्चा कोड प्रविष्ट करा व पुढे चला आपल्याला OTP येईल तो टाका व पुढे चला (सदर OTP हा ज्या मोबाईल ला आपला आधार लिंक असेल त्याच मोबाईलवर येईल.)
* आपल्या आधारचे पेज ओपन होईल त्यात Bank Seeding Status वर क्लीक करा
* आपला आधार कोणत्या बँकेत कोणत्या खात्याला जोडलेला आहे त्याचे डिटेल्स व स्टेटस आपल्याला समजेल.
* आपल्या आधारमधील पत्ता जर चुकीचा असेल तर तोही आपण १४ सप्टेंबर,२०२४ पर्यंत आपण स्वतः च विनाखर्च अपडेट्स करू शकता.
* आधार सीडिंग आर्थिक व्यवहार सुलभ करते, कागदपत्रे कमी करते आणि सुरक्षितता वाढवते.
* DBT आणि त्रासमुक्त बँकिंगचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असल्याची खात्री करा.
* Direct Benefit Transfer (DBT) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक प्रणाली आहे, ज्याद्वारे सरकारी योजनांद्वारे मिळालेल्या पैशाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात.
जिल्ह्यात किती जणांचे अनुदान रखडले?
तालुका | लाभार्थी | जमा | बाकी |
जालना | १९६८७ | १३०९२ | ३९११ |
बदनापूर | १२२२८ | ९२२१ | ५८३४ |
भोकरदन | १८८३९ | ९३७१ | ८९४३ |
जाफराबाद | १५८०९ | ९०२३ | ६३०७ |
परतूर | ५०९२ | ३०८६ | ९४० |
मंठा | ४०६७ | १९८६ | १८६८ |
अंबड | १९३३० | ७३८९ | ९५९६ |
घनसावंगी | १८६२६ | ९२१२ | ५८३४ |