Join us

महाराष्ट्र, गुजरात व गोव्यातील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय कार्यशाळा 

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 27, 2023 18:31 IST

महाराष्ट्र , गुजरात आणि गोव्यातील कृषी विज्ञान केंद्राची विभागीय कार्यशाळा उद्या छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी ...

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील कृषी विज्ञान केंद्राची विभागीय कार्यशाळा उद्या छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तीन दिवसीय विभागीय कार्यशाळा पार पडणार आहे. 

तिनही राज्यातील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार असून कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षभरातील प्रगती अहवालाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तीन दिवसीय कार्यशाळेत काही तांत्रिक सत्रांचा समावेश असणार आहे. तसेच वर्षभरातीळ कामाचा प्रगती अहवाल सादर करण्यात येणार आहे. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, पुणे आणि  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८-३० जुलै, २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही कार्यशाळा होणार आहे.  या कार्यक्रमामध्ये यामध्ये राज्याचे कृषि मंत्री मा.श्री.धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.श्री.भागवत कराड, मा.श्री.अब्दुल सत्तार यांची उपस्थिती अपेक्षित आहे. 

 या कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील एडिजी (कृषि विस्तार) मा.डॉ.आर.रॉय.बर्मन, पं.दे.कृ.वि., अकोल्याचे कुलगुरू मा. डॉ. एस. आर.गडाख, नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. झेड. पी. पटेल, वनामकृवि, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणी, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रऔरंगाबादशेतकरीपीकगोवागुजरातमहाराष्ट्र