Join us

७५ वर्षाची आजी 'ह्या' योजनेतून झाली २७ गुंठे सातबाराची मालकीण; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:46 IST

Laxmi Mukti Yojana मुख्यमंत्री, प्रशासकीय गतिमान अभियानअंतर्गत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी मुक्ती सुरू झाली आहे.

आमजाई व्हरवडे : मुख्यमंत्री प्रशासकीय अभियान अंतर्गत 'लक्षी मुक्ती' योजनेतून सिरसे (ता. राधानगरी) येथील ७५ वर्षे वयाच्या आजीच्या नावावर २७ गुंठे जमीन झाली आणि आजी या योजनेतून हक्काच्या सातबाराची मालकीण झाली.

मुख्यमंत्री, प्रशासकीय गतिमान अभियानअंतर्गत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी मुक्ती सुरू झाली आहे.

योजनांतर्गत सातबाऱ्यावर पत्नी अंजनाबाई रंगराव पाटील (वय ७५) यांचे नाव सहधारक म्हणून दाखल करण्यासाठी सिरसे येथील रंगराव लहू पाटील (वय ८४) यांनी ग्राम महसूल अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांच्याकडे अर्ज दिला.

त्यानुसार त्यांचे नाव दोनच दिवसांत लावून सातबारा प्रांताधिकारी प्रसाद चौगुले व तहसीलदार अनिता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दिला. यावेळी मंडल आधिकारी प्रविण पाटील कोतवाल दत्तात्रय चौगले व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यात या योजनेतून रुपया खर्च न होता पहिल्यांदा सातबाराची मालकीण होण्याचा मान अंजनाबाईला मिळाला.

जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घेऊन पत्नीचे नाव सातबारास नोंद करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांना अर्ज द्यावे. - प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी राधानगरी

अधिक वाचा: आता सातबाऱ्यावर येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीमहिलाकोल्हापूरमहसूल विभागसरकारराज्य सरकारजिल्हाधिकारीमंत्री