Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:17 IST

महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 'कृवीकें'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सत्रात शेळीपालनातील संधी, आर्थिक महत्त्व तसेच रोजगार निर्मितीच्या शक्यता यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पाच दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत शेळीपालनाची ओळख, उत्तम बोकड व शेळ्यांची निवड, विविध जाती, आहार व प्रजोत्पादन व्यवस्थापन, रोग नियंत्रण व लसीकरण या विषयांवर शिक्षण सहयोगी डॉ. बी. बी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच आंत्र व बाह्य परजीवी निर्मूलन याविषयी सहायक प्राध्यापक डॉ. स्वप्नील मेहेसरे यांनी माहिती दिली. यासोबतच गोठा व्यवस्थापन, करडांची जोपासना, संतुलित आहार तयार करण्याची प्रात्यक्षिके देण्यात आली.

प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन, मनोगत, प्रमाणपत्र वितरण व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यासोबतच शेळीपालन प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. “या प्रशिक्षणामुळे आम्हाला शेळीपालनाविषयी सखोल, शास्त्रीय व व्यवहार्य ज्ञान मिळाले असून आता आम्ही शेळीपालन व्यवसाय आत्मविश्वासाने व यशस्वीरीत्या सुरू करू शकतो,” अशी भावना प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विषय विशेषज्ञ पशुधन व्यवस्थापन डॉ. श्रीकांत खुपसे यांनी केले. सदर प्रशिक्षण संचालक डॉ. के. ए. धापके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

हेही वाचा : जनावरांना का गरजेचा असतो पशुआहार आणि त्याचे फायदे; जाणून घ्या पशुआहाराविषयी सविस्तर माहिती

English
हिंदी सारांश
Web Title : Goat Farming Training Program Successfully Concluded at MGM Krishi Vigyan Kendra

Web Summary : A five-day goat farming training program concluded at MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli. Twenty-five participants learned about goat selection, breeding, disease control, and creating balanced diets. The program aimed to provide self-employment opportunities and practical knowledge for successful goat farming.
टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतकरीशेतीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठछत्रपती संभाजीनगर