राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ८०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेले ३८ हजार ३५८ शेतकरी असून त्यांच्याकडे २०९.८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्जमाफीचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. सप्टेंबर २०२५ अखेर थकीत कर्जमाफ केले जाणार आहे.
शासनाच्या महाआयटी स्तरावर पोर्टल तयार केले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून माहिती भरण्याच्या सूचना जिल्हा बँकेला दिल्या आहेत. दोन लाख थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला असून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
जिल्हा बँकेकडे २ लाख खातेदार असून त्यांनी परतफेड केलेली रक्कम पाहिली तर ८०० कोटी रुपये अनुदान मिळू शकते.
जिल्हा बँकेतील थकबाकीदार शेतकरी
| पीक कर्ज | मार्च २०२५ अखेर शेतकरी | रक्कम | सप्टेंबर २०२५ अखेर शेतकरी | रक्कम |
| २ लाखांपर्यंत | ४३,८०८ | २४०.२९ कोटी | ३८,३५८ | २०९.८९ कोटी |
| २ लाखांवरील | ३,९५० | १४९.९८ कोटी | ३,५५२ | १३६.१४ कोटी |
| एकूण कर्ज | ४७,७५८ | ३९०.२७ कोटी | ४१,९१० | ३४६.०२ कोटी |
Web Summary : Two lakh Kolhapur farmers may receive ₹800 crore incentive under Ahilyadevi Holkar loan waiver scheme. Around 38,358 farmers have ₹209.89 crore outstanding until September 2025. Regular repayers will also get ₹50,000 incentive.
Web Summary : अहिल्यादेवी होल्कर ऋण माफी योजना के तहत कोल्हापुर के दो लाख किसानों को ₹800 करोड़ का प्रोत्साहन मिल सकता है। सितंबर 2025 तक लगभग 38,358 किसानों पर ₹209.89 करोड़ बकाया है। नियमित पुनर्भुगतान करने वालों को भी ₹50,000 का प्रोत्साहन मिलेगा।