Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी का दिला उपोषणाचा इशारा ? वाचा काय आहे कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 09:53 IST

महाराष्ट्र राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक येत्या तीन जुलैपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण पुणे येथील राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक येत्या तीन जुलैपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण पुणे येथील राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी दिली.

राज्यातील सुमारे दहा लाख पोल्ट्री व्यावसायिक या यांनी या उपोषणाला सक्रिय पाठिंबा दिले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ते हे आंदोलन करत आहेत. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कार्यालयावर हे उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर व सचिव विलास साळवी तसेच कार्याध्यक्ष शरद गोडांबे, नंदू चौधरी, सर्जेराव भोसले, एकनाथ गाडे, सुभाष केदारी यांनी हे नियोजन केलेले आहे.

राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत. मावळ तालुक्यातून या उपोषणासाठी गाडे यांच्यासह, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, महेश कुडले, उत्तम शिंदे, संभाजी शिंदे, विनायक बदले प्रयत्न करीत आहेत.

वीज बिल माफ करावे

पोल्ट्री योजना संघटनेच्या वतीने सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी लागू केलेली गाइडलाइन महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी. ग्रामपंचायतीने आकारलेली अवास्तव घरपट्टी रद्द करावी. वीज बिल माफ करावे, आदी मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक होईपर्यंत हे उपोषण चालणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

हेही वाचा :  आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहाराष्ट्र