Join us

अंडी उबवणूक केंद्र करेल मदत; कुक्कुटपालन करून कमवा बंपर नफा

By रविंद्र जाधव | Published: May 24, 2024 6:06 PM

कुक्कुटपालन करायचं आहे मग हे वाचच ..

आपण जाणून घेणार आहोत एक दिवासीय कोबड्यांची पिल्ले पुरविणारे तसेच प्रशिक्षण वर्ग घेणारे राज्याच्या विविध चार ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती अंडी उबवणूक या केंद्राबाबत.

या विषयी लोकमत अ‍ॅग्रोला सविस्तर माहिती देतांना मध्यवर्ती अंडी केंद्र पडेगाव छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मनोहर देवरे सरांनी सांगितले की, या पडेगाव स्थायिक केंद्राची स्थापना सन १९६२ साली झाली आहे. सुरुवातीच्या काळात हे कार्यालय तीन वर्ष खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय सर्वचिकित्सक कार्यालयाच्या आवारात कार्यरत होते. त्यानंतर १९६५ पासून सदर कार्यालय मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र पडेगाव छत्रपती संभाजी नगर येथील इमारतीत स्थापन झाले.

सदर मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्रासारख्या एकूण महाराष्ट्रात चार शिखर संस्था आहेत. ज्यात पुणे येथे मध्यवर्ती अंडी केंद्र पुणे, मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र कोल्हापूर, मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र पडेगाव छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र नागपूर असे चार मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र महाराष्ट्रात आहेत. 

मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र पडेगाव छत्रपती संभाजीनगर या केंद्राचे कार्यक्षेत्र हे मराठवाड्याचे पूर्ण आठही जिल्हे आहेत. तसेच याशिवाय धुळे जिल्हा आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा येथील शेतकऱ्यांना आणि योजना धारकांना येथून एक दिवसीय कुक्कुटपिल्ले पुरवठा मागणीनुसार केला जातो.

या कार्यालयाची किंवा या केंद्राचे उद्दिष्ट काय?

सुधारित जातीच्या एक दिवसीय पिल्लांची निर्मिती करून कुक्कुटपालकांच्या मागणी नुसार पुरवठा करणे. तसेच सुधारित जातीच्या कोंबडीच्या उगवणुकीसाठीची अंडे शासकीय दराने त्यांना पुरवठा करणे, विक्री करणे. या सोबतच शासनाच्या विविध योजना अंतर्गत एक दिवशीय पिल्लांची विक्री करणे किंवा तलंगा वाटप करणे. 

प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

पिल्लांची विक्री सोबतच मध्यवर्ती अंडी केंद्र पडेगाव छत्रपती संभाजीनगर मार्फत कुक्कुटपालकांना एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच ३५ वर्षांवरील पुढे वय असलेल्या सुशिक्षित बेरोजगार किंवा इच्छित असलेल्या तरुणांना किंवा ग्रामस्थांना पंधरा दिवसाचं एक प्रशिक्षण तिथे दिले जाते. यासोबतच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रशासकीय प्रमाणपत्र देखील दिले जाते.

अधिक महितीसाठी मध्यवर्ती अंडी केंद्र पडेगाव छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक : ०२४० - २३७०८९६

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीग्रामीण विकासशेती क्षेत्रशेतीमराठवाडा