Poultry Farm Management : अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी लसीकरण त्यांच्या आरोग्यासाठी आणि अंडी उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये पक्षाच्या वयानुसार लसीकरण करणे आवश्यक ठरते.
लसीकरणामुळे अंड्यांची गुणवत्ता सुधारते आणि रोगांचा प्रसार थांबतो. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या पिल्लापासून ते १८ व्या आठवड्यापर्यंत लस टोचणे गरजेचे असते.
अंडे देणाऱ्या कोंबड्यासाठी लसीकरण
| पक्षाचे वय | प्रतिबंधक | लस लस टोचण्याची पद्धत |
|---|---|---|
| १ दिवस | मॅरेक्स | पायाच्या स्नायुमध्ये (उबवणी केंद्रामध्ये) |
| ५ ते ७ दिवस | लासोटा (एफ. वन) | नाकातून अथवा डोळ्यातून १ थेंब |
| ७ दिवसानंतर | चोची कापणे | आधी वरची व खालच्या चोचीचा शेंडा कापणे |
| ७ ते १४ दिवस | गंबोरो | डोळ्यातून देणे |
| ४ था आठवडा | इनफेक्ट्क्सिस ब्राँकायटिस | डोळ्यात एक थेंब टाकणे |
| ५ वा आठवडा | लासोटा | पिण्याच्या पाण्यातून देणे |
| ८ वा आठवडा | देवीची लस | पायाच्या मांसल भागात |
| १० वा आठवडा | रानीखेत लस (आर.बी.) | पायाच्या मांसल भागात |
| १० ते १२ आठवडे | चोची कापणे | वाढलेल्या चोची कापणे व तो भाग वाढू देऊ नये |
| १८ वा आठवडा | रानीखेत लस (लासोटा) | पाण्यातून देणे |
सूचना : वरील प्रतिबंधक लस टोचल्यानंतर ३ दिवस व्हिटॅमिन मिश्रण पाण्यातून अगर खाद्यातून द्यावे. त्यामुळे कोंबड्यांना लस टोचण्याचा ताण कमी होईल व कोंबड्या नेहमीप्रमाणे राहतील. सरासरी २ ते ३ महिन्यानंतर एकदा जंताचे औषध पाजावे.
