Join us
Daily Top 2Weekly Top 5

Poultry Temperature : वाढत्या उन्हात पोल्ट्री शेडमध्ये थंडावा करण्यासाठी या गोष्टी करा, कोंबड्यांना थंडावा मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:50 IST

Poultry Temperature : उष्माघाताचा धोका वाढल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. 

लासलगाव : वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम पोल्ट्री व्यवसायाला बसत असून शेतकरी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. 

उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न व पाणी घेण्याचे प्रमाण घटले असून त्यांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तापमानात वाढ होत असल्याने पोल्ट्रीधारकांकडून शेडमध्ये थंडावा राखण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अशा करा उपाययोजना 

  • छतावर आच्छादन : शेडच्या छतावर गवत, पेंढा, किंवा नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन करा, ज्यामुळे छताचे तापमान थेट वाढणार नाही.
  • स्प्रिंकलर : दुपारी छतावर स्प्रिंकलर बसवून पाण्याचे फवारे मारा. यामुळे शेडची छत थंड राहते.
  • पांढरा रंग : छतावर पांढरा चुना लावल्यास सूर्यप्रकाश परावर्तित होऊन छत कमी गरम होते.
  • पडदे व्यवस्थापन : शेडच्या बाजूंनी गोणपाटाचे (पोत्यांचे) पडदे लावा आणि दिवसातून ३-४ वेळा त्यावर पाणी शिंपडा. यामुळे आत येणारी हवा थंड होऊन येते.
  • कूलर आणि फॅन : शेडमध्ये फॉगर्स  किंवा कुलिंग पॅड्स आणि एक्झॉस्ट फॅन बसवून हवा खेळती ठेवा.
  • झाडे : शेडच्या आसपास सावली देणारी झाडे असावीत, मात्र थेट शेडवर सावली नसावी, जेणेकरून हवा खेळती राहील. 
  • थंड पाणी : पक्ष्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्या. पाण्याच्या टाक्या सावलीत ठेवा.

 

50 एकरांवर फळबाग शेती, थेट परदेशात निर्यात, दरही चांगला, शिंगाडे कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा

English
हिंदी सारांश
Web Title : Poultry Heatwave Tips: Keep Your Chickens Cool in Summer Heat!

Web Summary : Rising temperatures threaten poultry farms. Farmers are using shade, sprinklers, and cooling systems to protect chickens from heatstroke and mortality. Adequate water and ventilation are crucial.
टॅग्स :पोल्ट्रीतापमानशेती क्षेत्रहवामान अंदाज