Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > हिवाळ्यात कोंबड्यांची मरतूक कमी करायची असेल तर या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

हिवाळ्यात कोंबड्यांची मरतूक कमी करायची असेल तर या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Latest news Poultry farm mortality rate among chickens increases during winter how to control | हिवाळ्यात कोंबड्यांची मरतूक कमी करायची असेल तर या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

हिवाळ्यात कोंबड्यांची मरतूक कमी करायची असेल तर या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Planning in Poultry Sheds : या काळात कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढते, ते कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

Planning in Poultry Sheds : या काळात कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढते, ते कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

हिवाळ्यात पोल्ट्री शेडमध्ये पक्ष्यांना ऊब देणे, गारठ्यापासून वाचवणे आणि हवा खेळती ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढते, ते कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

हिवाळ्यामध्ये शेडमधील नियोजन

  • कोंबड्यांचे अती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या लांबीच्या बाजूने असलेल्या जाळीस स्वच्छ व कोरडे पडदे लावावेत. 
  • पडद्यांची उघडझाप सहज करता यावी. पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. 
  • दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
  • शेडमध्ये योग्य वायुवीजन व खेळती हवा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
  • त्यासाठी ज्या वेळेस शक्य आहे, अशा वेळेस पडद्यांची उघड-झाप वरून खाली करावी. 
  • तसे केल्यास कार्बन डायऑक्साइडयुक्त दूषित हवा पटकन बाहेर फेकली जाते. 
  • अशी दूषित हवा बाहेर न टाकल्यास आणि कोंबड्यांना ऑक्सिजनयुक्त (स्वच्छ) हवा उपलब्ध न झाल्यास त्यांना हायपोक्सीया (ऑक्सिजनची कमतरता) होतो. जलोदरसारखे चयापचयाचे आजार होतात, मरतूक वाढते.
  • कोंबड्या शेडवर आल्यानंतर साधारण तिसऱ्या आठवड्यापासून जलोदरचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. 
  • शेडला लावलेल्या पडद्यांचे उघडझाप करण्याचे नियोजन योग्य न केल्यास, शेडमधील तयार होणारा अमोनिया बाहेर फेकला जात नाही. 
  • त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढून कोंबड्यांना श्वसन संस्थेचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो. 
  • यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते, औषधांचा खर्च वाढतो. 
  • म्हणून हिवाळ्यामध्ये शेडला लावलेल्या पडद्यांचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : सर्दी में मुर्गियों की मृत्यु दर कम करें: पोल्ट्री फार्म टिप्स

Web Summary : वेंटिलेशन के लिए शेड के पर्दे प्रबंधित करके मुर्गियों को सर्दी से बचाएं। उचित वायु प्रवाह अमोनिया के निर्माण, श्वसन संबंधी समस्याओं और वजन घटने से रोकता है। बीमारियों और मृत्यु दर से बचने के लिए ऑक्सीजन का स्तर बनाए रखें, स्वस्थ मुर्गी पालन सुनिश्चित करें।

Web Title : Reduce Chicken Deaths in Winter: Essential Poultry Farm Tips

Web Summary : Protect poultry from winter's chill by managing shed curtains for ventilation. Proper airflow prevents ammonia buildup, respiratory issues, and reduced weight gain. Maintain oxygen levels to avoid diseases and mortality, ensuring healthy poultry farming.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.