Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Poultry Farm : कुक्कुटपालन व्यवसायात पिल्लांचे ब्रूडिंग करताना अशी काळजी घेतली तरच.... 

Poultry Farm : कुक्कुटपालन व्यवसायात पिल्लांचे ब्रूडिंग करताना अशी काळजी घेतली तरच.... 

Latest News kukkutpalan While brooding chicks in poultry farming business see details | Poultry Farm : कुक्कुटपालन व्यवसायात पिल्लांचे ब्रूडिंग करताना अशी काळजी घेतली तरच.... 

Poultry Farm : कुक्कुटपालन व्यवसायात पिल्लांचे ब्रूडिंग करताना अशी काळजी घेतली तरच.... 

Poultry Farming : पक्षांच्या वयाच्या सुरूवातीचे तीन ते चार आठवडे (ब्रुडिंग अवस्था) काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक आहे.

Poultry Farming : पक्षांच्या वयाच्या सुरूवातीचे तीन ते चार आठवडे (ब्रुडिंग अवस्था) काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Farming :  परसातील कुक्कुटपालकांनी (Kukkutpalan) पक्षांच्या वयाच्या सुरूवातीचे तीन ते चार आठवडे (ब्रुडिंग अवस्था), त्यांचे काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक आहे. सुरूवातीच्या वयाच्या या काळात संरक्षीत ठिकाणी पक्षांची वाढ केली जावी. कुक्कुटघरांमध्ये पुरेसी उब निर्माण करण्यासाठी विद्युत दिवे वा घरगुती इतर पर्यायांचा वापर केला जावा. 

आधुनिक कुक्कुटघरांमधे पक्षीपालन (Poultry farm) करणाऱ्या कुक्कुटपालकांनी पिलांचे संगोपन करण्यापूर्वी, कुक्कुटघरांमधील पक्षांच्या पाणी व खाद्याची भांडी स्वच्छ धुऊन व वाळवून तयार ठेवावीत. पिले आणण्यापूर्वी पक्षीघरामध्ये विद्युत पुरवठा व्यवस्थित आहे किंवा नाही हे पाहणी करून, घ्यावे. पिलांना ब्रुडिंग करण्यासाठी (brooding chicks) आवश्यक क्षमतेचे विद्युतदिवे आधुनिक कुक्कुटघरांमध्ये बसविणे आवश्यक आहे.

बुडिंग अवस्थेसाठी असलेली जागा स्वच्छ असावी. तेथील जाळे, धूळ, भिंतीला लागलेली घाण स्वच्छ धुतल्यानंतर, भिंतीचे कोपरे व जाळीला अडकलेली कोळ्याची जाळी काढून घ्यावीत. अशी जागा धुवून तिथे जंतूनाशकांचा फवारा करणे आवश्यक असून ती वाळल्यानंतर गनीबॅगचे पडदे लावून झाकूण घ्यावी. 

पिले या निवाराघरी येण्यापूर्वी अंदाजे एक आठवडा अगोदर ब्रुडरमध्ये भाताचे तूस किंवा साळीचा भूसा, 2 ते 3 इंच जाडीचा थर पसरून घ्यावा. त्यावर जुने वर्तमानपत्र पसरवून टाकावीत, जेणेकरून पिले जमिनीवरील भूसा खाणार नाहीत. पिले येण्यापूर्वी काही तास अगोदर विद्युतदिवे चालू करून तैथे आवश्यक तापमान (अंदाजे 90 ते 95°F) निर्माण झाले पाहीजे असे नियोजन करावे.

पिलांना वयाच्या पहिल्या दिवशी मरेक्स आजाराविरूद्ध व सातव्या दिवशी राणीखेत आजाराविरूद्ध लसीकरण करण्यात यावे, वयाच्या तीन ते चार आठवडयानंतर ही पिले परसात किंवा मोकळ्या जागेत सोडून दिली जाऊ शकतात, त्यांना आवश्यक असलेला नैसर्गिक आहार ती घेण्यास सुरूवात करतात. 

सुरवातीच्या या काळातच या पक्षांना संध्याकाळी निवाऱ्यासाठी पिंजऱ्यापर्यंत येण्याची सवय लावणे आवश्यक आहे. सदर पिजऱ्यांमधे आवश्यक प्रकाश, निरोगी हवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षांचा त्यांच्या नैसर्गिक भक्षक प्राण्यांपासून देखील या निवारा पिंजऱ्यांमुळे बचाव होणे आवश्यक आहे.

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव 

Web Title: Latest News kukkutpalan While brooding chicks in poultry farming business see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.