नागपूर : शहरात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला असून सेमिनरी हिल्स परिसरातील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात एच-५ एन-१ (Avian Influenza) विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित परिसर ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.(Bird Flu Alert in Nagpur)
भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ तसेच पुण्यातील रोग अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार, नागपूर येथील या केंद्रातील कुक्कुट पक्ष्यांचे नमुने एच-५ एन-१ विषाणूसाठी पॉझिटिव्ह आढळले.(Bird Flu Alert in Nagpur)
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अधिसूचना जारी केली.(Bird Flu Alert in Nagpur)
१ किमी परिसर 'बाधित', ९ किमी 'निगराणी'
सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्राभोवती १ किलोमीटर त्रिज्येतील भाग बाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तर त्यापुढील ९ किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पुढील २१ दिवस कडक निर्बंध लागू राहणार आहेत.
कडक निर्बंध लागू
बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुटपक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बंधित निर्मूलन
अंडी, पक्षी खाद्य यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश
कुक्कुटपक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक पूर्णतः बंद
बाजार, जत्रा, प्रदर्शन यांवर बंदी
सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण रोखली
तसेच निगराणी क्षेत्रातील कुक्कुट विक्री दुकाने आणि बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्जंतुकीकरण व नियंत्रण उपाययोजना
प्रशासनाने बाधित क्षेत्रात तातडीने निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय रुग्णालये आणि महापालिका प्रशासन यांना संयुक्तपणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे आवाहन
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुक्कुटपालन व्यवसायिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
नागपुरात आढळलेल्या या घटनेमुळे राज्यातील कुक्कुटपालन क्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुढील काही दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Animal Healthcare : पशुपालकांसाठी मोठी खुशखबर; आता मिळणार 'डबल' सुविधा!
अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!
Web Summary : Tur market sees mixed trends. Arrivals are good, but prices fluctuate across markets. Red Tur sees high demand, fetching good rates. Average rate: ₹7,000-₹7,700.
Web Summary : तुअर बाजार में मिश्रित रुझान। आवक अच्छी है, लेकिन बाजारों में कीमतें बदलती रहती हैं। लाल तुअर की मांग अधिक है, जिससे अच्छी दरें मिल रही हैं। औसत दर: ₹7,000-₹7,700।