Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन 

हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन 

Latest News Advice for livestock ani poultry farm birds in winter | हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन 

हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन 

हिवाळ्यात पशुधनाची काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

हिवाळ्यात पशुधनाची काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

सध्या थंडीचे दिवस असून दुसरीकडे वातावरण बदल देखील झाल्याने शेती पिकांबरोबरच पशु पक्ष्यांवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. हळूहळू थंडी वाढू लागल्याने गाई गुरे आजारी पाडण्याचे प्रमाण वाढते. यासाठी हिवाळ्यात पशुधनाचे काळजी घेणे महत्वाचे ठरते. हिवाळ्यात पशुधनाची काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

पोल्ट्रीफार्म उबदार ठेवण्यासाठी 

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यक विषय विशेषज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी हिवाळ्यात पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली आहे.  हिवाळ्यात सगळीकडे वातावरण बदल जाणवतो. अशावेळी पशुपक्ष्यांचा घर उबदार ठेवणे आवश्यक असते. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचं घर उबदार कस करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. साधारणपणे पहिल्या आठवड्याला लहान पक्षी असताना 95 डिग्री फरेनाईट इतके तापमान आवश्यक असते. दुसऱ्या आठवड्याला साधारण 90 डिग्री फॅरेनाईट तापमान पाहिजे, तिसऱ्या आठवड्याला 85 डिग्री फॅरेनाईट तापमान पाहिजे, हे तापमान जर नियंत्रित ठेवता आले तर अधिक सोयीस्कर ठरते. 

गोठा उबदार ठेवण्यासाठी ही करा.. 

दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर थंडी असते. अशावेळी रुडींग इलेट्रीक बल्ब लावू शकतो, या द्वारे देखील पॉलिहाऊस किंवा गोठ्याचा उबदारपणा वाढवू शकतो. पोल्ट्रीहाऊस किंवा गोठ्याच्या आत येणारी हवा कशी थांबवू शकतो? तर यामध्ये बऱ्याचवेळा उत्तर आणि दक्षिण बाजू बंद ठेवायच्या असतात. पूर्व आणि पश्चिम बाजू मोकळ्या ठेवायच्या असतात. पूर्वेकडून येणारे ऊन गोठ्यात आले पाहिजे, दुपारी सूर्य हा गोठ्याच्या डोक्यावर आला पाहिजे. तसेच तीन चार वाजेनंतर येणारे ऊन आहे, ते पुन्हा गोठ्यात आले पाहिजे. अशीव्यवस्था जनावराच्या गोठ्याची असेल तर निश्चित तापमान नियंत्रित ठेवता येईल. 

अधिवास व्यवस्थापन महत्वाचं... 

दरम्यान पशुपालन करताना पशु पक्ष्यांच्या अधिवास व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे. हिवाळ्याच्या काळात आतील आणि बाहेरील तापमानात मोठा फरक असतो. गाई गुरांच्या गोठ्याबरोबरच कोंबड्याच्या पोल्ट्री फार्मला देखील हिवाळ्यात मोठी काळजी घेणे गरजेचे ठरते. गोठ्याचे जसे तापमानाचे व्यवस्थापन असते, मात्र पोल्ट्रीच्या घरात यापेक्षा वेगळे वातावरण अनुभवायला मिळते. यात थेट सूर्यप्रकाश आत येत नाही, जनावरांच्या गोठ्याच्या उलट बाजू पोल्ट्रीच्या घरात पाहायला मिळते. पूर्व आणि पश्चिम बाजूला भिंती असतात, तर उत्तर आणि दक्षिण बाजूला मोकळी बाजू असते. अशावेळी रुडींगची योजना अवलंबावी लागते. 
 

Web Title: Latest News Advice for livestock ani poultry farm birds in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.