Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Fish Farming : अधिक मत्स्योपादनासाठी माशांची वाढीची नोंद ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

Fish Farming : अधिक मत्स्योपादनासाठी माशांची वाढीची नोंद ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

latest news Keep records of fish growth for more fish farming, know in detail | Fish Farming : अधिक मत्स्योपादनासाठी माशांची वाढीची नोंद ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

Fish Farming : अधिक मत्स्योपादनासाठी माशांची वाढीची नोंद ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

Fish Farming : ळ्यातन जाळे फिरवले गेल्याने माशांना व्यायाम मिळतो व वाढ होण्यास (Fish Production) मदत होते.

Fish Farming : ळ्यातन जाळे फिरवले गेल्याने माशांना व्यायाम मिळतो व वाढ होण्यास (Fish Production) मदत होते.

शेअर :

Join us
Join usNext

Fish Farming : अलीकडे मत्स्य शेती (Matsya sheti) मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. यातील महत्वाचा घटक म्हणजे माशांची वाढ तपासणी करणे, मत्स्य उत्पादन झाल्यानंतर मासेमारीचे व्यवस्थापन करणे तसेच मासळीचे संरक्षण आणि विक्री व्यवस्था (Fish Production) करणे हे होय. याबाबत आजच्या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... 

माशांची वाढ तपासणी : 
शेततळ्यातील मत्स्यसाठा व त्याची वाढ याचा अंदाज घेवून खाद्याची मात्रा कमी अधिक करणे, मोठे विक्रीयोग्य मासे काढणे, माशांना एखादा रोग झाला असल्यास उपाययोजना करणे शक्य व्हावे. यासाठी तळ्यात २० ते ३० दिवसात एकदा तलावातील मासे फेकजाळे, ओढप जाळे याद्वारे पकडून वाढ तपासावी. त्यानुसार पुरक खाद्याची मात्रा वाढविण्यात यावी.

या पाहणीत आढळून आलेल्या माशांची संख्या, वजन, लांबी याची नोंद ठेवावी. तळ्यातन जाळे फिरवले गेल्याने माशांना व्यायाम मिळतो व वाढ होण्यास मदत होते. मत्स्यबीज अधिक घनतेने साठविले असल्यास पाण्यात विरघळलेल्या प्राणवायू, पाण्याचे तापमान याचे परिक्षण नियमित करणे फायदेशिर असते.

मत्सउत्पादन व मासेमारी :

  • मत्स्यसंवर्धनाच्या ८ ते १० महीन्याच्या कालावधीत सरासरी ७५० ग्रॅम व त्यापेक्षा अधिक थोड्याफार प्रमाणात माशांची वाढ होत असते. 
  • तांत्रिक पध्दतीने मत्स्यसंवर्धन केल्यास प्रतिहेक्टर १०००० किलो (१०टन) व त्यापेक्षा जास्त प्रमाणात मत्स्योत्पादन मिळू शकते. 
  • फेकजाळ्याने, गिलनेटने स्थानिक मासे पकडणाऱ्या मासेमारांच्या मदतीने योग्य आकाराचे मासे काढल्यास चांगला दर मिळतो. 
  • मासळीचा दर हा स्थानिक मागणी, उपलब्धता, मासळीची प्रतवारी, आकारमान तसेच आठवडीबाजार यावर कमी जास्त प्रमाणात अवलंबून असतो. 
  • योग्य हंगामात मासळीची विक्री केल्यास दर चांगला मिळू शकतो.

 

मासळीचे सुरक्षण व वाहतूक विक्री : 

  • मासेमारीनंतर पकडलेली मासळी स्वच्छ धुवून वजनानुसार किंवा आकारमानानुसार वेगवेगळी वाढावी. 
  • मासळी लगेच विकणे शक्य असल्यास विकावी किंवा बर्फामध्ये थर ठेवून साठवणूक करून ठेवावी. 
  • अधिक चांगला भाव मिळण्यासाठी व वाहतूकीसाठी शितपेट्याचा वापर करावा. व जलद विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करावी. 


- सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक

Web Title: latest news Keep records of fish growth for more fish farming, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.