Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > शिक्षण दहावी पास, 200 रुपयांपासून मत्स्य व्यवसायाची सुरवात, आता महिन्याला लाखोंची कमाई 

शिक्षण दहावी पास, 200 रुपयांपासून मत्स्य व्यवसायाची सुरवात, आता महिन्याला लाखोंची कमाई 

Latest News 10th pass gadchiroli district Youth Farmer earning lakh rupees from the fisheries business | शिक्षण दहावी पास, 200 रुपयांपासून मत्स्य व्यवसायाची सुरवात, आता महिन्याला लाखोंची कमाई 

शिक्षण दहावी पास, 200 रुपयांपासून मत्स्य व्यवसायाची सुरवात, आता महिन्याला लाखोंची कमाई 

Fish Business : दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, गरीब परिस्थितीत वाढलेल्या तरुणाने मत्स्य व्यवसायातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Fish Business : दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, गरीब परिस्थितीत वाढलेल्या तरुणाने मत्स्य व्यवसायातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

- भीमराव मेश्राम 

Fish Business :  व्यवसायासाठी पदवी किंवा शिक्षणच व्यावसायिक आवश्यक असते, हा गैरसमज खोडून काढत मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे आरमोरी तालुक्यातील नागरवाही येथील पुरुषोत्तम वासुदेव मेश्राम यांनी सिद्ध केले आहे. 

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, गरीब परिस्थितीत वाढलेल्या या तरुणाने मच्छी विक्रीच्या व्यवसायातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आज तो अनेक पदवीधर तरुणांसाठीही प्रेरणास्थान ठरला आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अल्प वयातच पुरुषोत्तम यांनी सायकलवर मच्छीचा डबा घेऊन गावखेड्यांत फिरण्यास सुरुवात केली. त्या काळात सर्वजण त्यांना 'पुरुषा' म्हणून हाक मारत. स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवून, निर्व्यसनी राहून त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. ग्राहकाला देव मानून केलेल्या प्रामाणिक व्यवहारामुळे आज व्यापारी वर्तुळात त्यांची ओळख 'प्रकाश' या नावाने सन्मानाने घेतली जाते.

मशांच्या साठवणुकीसाठी घरीच बांधले टाके
सुरुवातीला मांगूर व जरंग मच्छी सायकलवर विकणाऱ्या पुरुषोत्तम यांनी पुढे मोटारसायकलने दूरचे बाजार गाठले. आज ते मालवाहू मोठ्या वाहनातून छत्तीसगड, भंडारा, गोंदिया येथून ठोक भावात मासे आणतात. 

स्वतःच्या घरी त्यांनी १० बाय ८ चा ५ फूट खोल टाके तयार करून जरंग व मांगूर मच्छी साठवणुकीची व्यवस्था केली आहे. चविष्ट आणि स्वस्त असलेल्या या मच्छीला गावखेड्यांत मोठी मागणी आहे. मोठ्या व्यापाऱ्यांसोबतच लहान व्यावसायिकांनाही ते मासे पुरवतात.

रोजगारासाठी मदत, व्यसनमुक्तीचाही देतात संदेश
स्वकर्तृत्वावर त्यांनी एक मालवाहू वाहन, एक प्रवासी वाहन व ट्रॅक्टर खरेदी केले आणि स्वतःचे घर उभारले. एकेकाळी सायकलवर मच्छी विकणारा 'पुरुषा' आज समाजात प्रतिष्ठित व्यावसायिक बनला आहे.

अनेकांना रोजगारासाठी मदत करत, व्यसनमुक्तीचा संदेश देत त्यांनी समाजासाठीही आदर्श निर्माण केला आहे. पोटाची खळगी भरताना जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाची शिडी चढता येते, हे प्रकाश मेश्राम यांचा जीवनसंघर्ष सांगतो.

Web Title : दसवीं पास ने 200 रुपये से शुरू किया मछली का कारोबार, लाखों की कमाई।

Web Summary : आरमोरी के पुरुषोत्तम मेश्राम, जो दसवीं पास हैं, ने कड़ी मेहनत और ईमानदारी से मछली के कारोबार में सफलता हासिल की। सिर्फ 200 रुपये से शुरुआत करके, अब वे हर महीने लाखों कमाते हैं, जो कई स्नातकों के लिए प्रेरणादायक है।

Web Title : Tenth-pass man starts fish business with Rs 200, earns lakhs.

Web Summary : Purushottam Meshram, a tenth-pass from Armori, achieved success in the fish business through hard work and honesty. Starting with just Rs 200, he now earns lakhs monthly, inspiring many graduates.