lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट

मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट

Be careful of 'tilapia fish' while fishing | मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट

मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट

'जिलेबी' ( तीलापिया) मुळे मासळींच्या आयुष्यात कुपोषणाचे संकट. ‘खादाड' तीलापिया तुपाशी... अन्य मासे मात्र उपाशी

'जिलेबी' ( तीलापिया) मुळे मासळींच्या आयुष्यात कुपोषणाचे संकट. ‘खादाड' तीलापिया तुपाशी... अन्य मासे मात्र उपाशी

शेअर :

Join us
Join usNext

वर्षभरात चार ते पाचवेळा प्रजननशक्ती असणाऱ्या 'जिलेबी' जातीच्या मादी मासळींमुळे खाद्य मिळत नसल्याने अन्य मासळींवर कुपोषणाची वेळ येऊन ठेपली आहे. 'जिलेबी' मासळीचे राज्यभरातील प्रमाण प्रचंड वाढल्याने मत्स्य व्यावसायिकांसमोर संकट उभे ठाकले आहे. 'तीलापिया' (ओरीओक्रोमिस मोझांबिकस) या शास्त्रीय नावाने ओळख असणारा हा मासा महाराष्ट्रात 'जिलेबी' आणि 'मत्स्य- चिकन' नावाने प्रचलित आहे.  २००८ मध्ये सोलापूरच्या उजनी धरणात ही प्रजाती आढळली. तीलापिया मासा दुसऱ्या महिन्यात प्रजननक्षम होतो. त्यांचे प्रजनन वेगाने घडते.

महाराष्ट्रात कुठे?
सोलापूरच्या उजनी धरणात हा मासा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उजनीच्या आजूबाजूला असणाऱ्या पुणे, इंदापूर, बारामती, सोलापूर ते पार उस्मानाबाद, लातूर, बीड आणि सांगली, सातारा या भागात हा मासा आवडीने खाल्ला जातो. नाशिकच्या गिरणा धरण, जळगावच्या बहुळा, नागपूरच्या उमरी, नांदेडच्या इसापूर, परभणीच्या कर्परा आणि यवतमाळच्या अरुणावती धरणात हा मासा मोठ्या प्रमाणावर आहे.

'जिलेबी' ठरली डोकेदुखी
१९५२ मध्ये बोत्सवाना या देशातून भारतात आलेली 'जिलेबी' मासळी अन्य प्रजातींच्या माशांसाठी घातक आहे. या प्रजातीचा मासा इतर माशांच्या प्रजननात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांमधील जैवविविधता संपुष्टात येते. प्रथिने आणि उर्जा समृद्धी असलेले तीलापिया मासे विविध प्रकारचे खाद्य खातात. उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आणि परिपक्वता दोनच महिन्यात येत असल्यामुळे या जातीच्या मासळीला मोठ्या प्रमाणावर खाद्य लागते.

असा पोहोचला धरणांमध्ये
मादी एका वर्षात ४-६ वेळा लाखोंच्या संख्येने अंडी घालते. प्रजनन काळात नर-मादी एकत्रित येऊन स्वतःचे प्रदर्शन करतात. हे मासे तोंडात धरून अंड्यांचे जतन करत असल्यामुळे अंडीही सुरक्षित राहतात, आणि बीज टाकण्याची गरज नाही  या आशेपायी अनेक व्यावसायिक या माशाच्या प्रेमात पडले आणि हा मासा महाराष्ट्रातील  धरणांमध्ये पोहोचला.

तीलापिया या प्रजातीमुळे स्थानिक मत्स्य जैवविविधता धोक्यात आली असून, स्थानिक प्रजातींचा हास होऊ नये, म्हणून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. संकर तीलापिया, गिफ्ट तिलापिया संवर्धनासाठी मत्स्यव्यवसाय विभागाची परवानगी घेणे सक्तीचे आहे, ही बाब गंभीरपणे ध्यानात घ्यावी.
शरद कुदळे, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) जळगाव

Web Title: Be careful of 'tilapia fish' while fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.