सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात मांसासाठीच शेळीपालन केले जाते. परंतू अजूनही याकडे कोणीही व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहात नाही. शेळीपालनव्यवसायिक पद्धतीने केल्यास, ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक स्थिती बदलण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे.
करडांचे व्यवस्थापन• करडु जन्मल्याबरेबर आईला चाटू द्यावे म्हणजे त्यांत मातृत्वाची भावना दृढ होते.• नाकातील चिकट द्रव साफ करावा.• करडांना अर्ध्या तासाचे आत चिक पाजावा.• पंधरा दिवसानंतर थोडा वाळलेला चारा चघळु द्यावा.• जोमदार वाढीसाठी (ईद करीता) ६० टक्के खाद्य व ४० टक्के चारा या प्रमाणात आहार द्यावा.• सहा महिने वयात २० ते २५ किलोचे करडु विक्रीसाठी तयार होणे गरजेचे आहे.
पैदास नराचे व्यवस्थापन• दिड वर्षापेक्षा कमी वयाचा नर पैदाशीसाठी वापरु नये.• नर कायम कळपात ठेवू नये.• पैदास हंगामात पोटावरील केस कापावेत.• दोन नर पैदास हंगामात शक्यतो एकत्र ठेवू नयेत म्हणजे त्यांच्यात मारामारी होणार नाही.• पैदास हंगामात नरांना सकस प्रथीनयुक्त आहार द्यावा जेणेकरुन त्यांची प्रजनन क्षमता वाढेल.
माद्यांचे व्यवस्थापन• नऊ महिने ते एक वर्षापर्यंत माद्या वयात येतात.• पैदास हंगामात मद्यांना सकस हिरवा चारा मिळेल याची काळजी घ्यावी.• पैदास हंगामापुर्वी, गाभण काळातील शेवटच्या• महिन्यात आहार व खाद्य वाढवावे, म्हणजे जुळ्यांचे प्रमाण वाढेल आणि वजनदार करडे जास्त मिळतील.• गाभण व दुभत्या माद्यांच्या आहारात क्षार मिश्रणाचा वापर करावा.• गाभण शेळ्या इतर कळपा पासुन वेगळ्या ठेवाव्यात.• विलेल्या शेळीची काळजी घ्यावी, मागील भाग स्वच्छ धुवावा, सडे फोडावीत, करडू व्यवस्थीत पाजावे.
अधिक वाचा: Sheli Palan : शेळीपालनात करडांचा, शेळ्यांचा व बोकडांचा आहार कसा असावा.. वाचा सविस्तर