Join us

ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:54 IST

cow dung log making ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील घरगुती वापरासाठी, वीटभट्टीसाठी, हॉटेल्स, ढाबे व स्मशानभूमीत सर्रासपणे लाकडाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षतोड केली जाते.

ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील घरगुती वापरासाठी, वीटभट्टीसाठी, हॉटेल्स, ढाबे व स्मशानभूमीत सर्रासपणे लाकडाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षतोड केली जाते.

यावर पर्याय म्हणून शेणापासून लाकूड तयार करणारे यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. त्याच्या वापराद्वारे या समस्येवर काही प्रमाणात सहज मात करता येऊ शकते.

हे यंत्र कसे काम करते?◼️ लाकूड तयार करण्यासाठी ओले शेण, लाकडाचा भुसा, सुक्या गवताचा चुरा याचा वापर करण्यात येतो.◼️ काही ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार सर्वसाधारणपणे याचे प्रमाण ६०:३०:१० असे असते किंवा यात भुसा व गवताचा चुरा कमी जास्त करून कोणते प्रमाण योग्य राहील त्यानुसार तिन्ही घटकाचे प्रमाण ठरविण्यात यावे.◼️ लाकडाचा भुसा उपलब्ध होत नसल्यास फक्त शेणाचा वापर करून देखील लाकूड बनविण्यात येते. यासाठी पूर्ण ताजे शेण वापरण्याऐवजी २ ते ३ दिवस झालेले शेण वापरावे.

प्रक्रियेचे तीन टप्पेटप्पा क्रमांक १)ओले शेण, लाकडाचा भुसा, सुक्या गवताचा चुरा यांचे ६०:३०:१० या प्रमाणात मिश्रण तयार करण्यात यावे. मजुरांद्वारे हाताने अथवा उपलब्ध असल्यास मिक्सरचा वापर करण्यास हरकत नाही. मिक्सरच्या वापरामुळे चांगले एकसारखे व कमी वेळेत मिश्रण तयार करता येऊ शकते.टप्पा क्रमांक २)तयार झालेले मिश्रण मशीनच्या हॉपरमध्ये थोडे थोडे करून टाकत रहावे. मशीनमधील स्क्रू मेकॅनिझम प्रक्रियेद्वारे मिश्रणाचा गोल अथवा चौकोनी लाकडाच्या आकाराचा लगदा तयार होऊन बाहेर पडतो.टप्पा क्रमांक ३)बाहेर पडणारा शेणाचा लगदा हा ओला व नाजूक असल्याने त्याचे तुकडे होऊ नये म्हणून उभा अर्धा कापलेल्या व तीन ते चार फुट लांब असलेल्या पी.व्ही.सी. पाईपमध्ये मजुराद्वारे गोळा करून उन्हात सुकण्यास ठेवण्यात यावा. पूर्ण सुकलेली लाकडे गोळा करून शेडमध्ये रचून ठेवण्यात यावी.

पर्यावरणीय फायदे◼️ कमी झालेली जंगलतोडशेणाच्या लाकडांचा वापर वृक्षाच्या लाकडाची जागा घेऊ शकतो, ज्यामुळे वृक्ष लाकडाची मागणी कमी होते आणि जंगलांचे संरक्षण होण्यास मदत होते.◼️ कचरा व्यवस्थापनलाकडांसाठी शेणाचा वापर केल्याने प्राण्यांच्या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होते. पर्यावरण स्वच्छ होते आणि प्रदूषण कमी होते.◼️ पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारपारंपारिक लाकडाच्या चितेला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून अंत्यसंस्कारात शेणाच्या लाकडाचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे.◼️ कमी कार्बन फूटप्रिंटजिवाश्म इंधन किंवा लाकूड जाळण्याच्या तुलनेत शेणाचे लाकूड जाळल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होतो.

आर्थिक फायदे◼️ उत्पन्न निर्मितीया यंत्राचा वापर गाईच्या शेणापासून मूल्यवर्धित उत्पादने (लाकडे) तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याची विक्री केली जाऊ शकते, ज्यामुळे शेतकरी आणि गौशाळांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो.◼️ कचरा विल्हेवाटीचा खर्च कमीलाकडांसाठी शेणाचा वापर करून, कचरा विल्हेवाटीचा खर्च कमी करता येतो.◼️ वाढीव कार्यक्षमतेची शक्यताहे यंत्र लाकूड बनवण्याची प्रक्रिया सुलभ करते, ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनते.

इतर फायदे◼️ सरलीकृत लाकडे बनवणेहे यंत्र शेणाच्या लाकडाच्या निर्मितीची प्रक्रिया स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित करते, ज्यामुळे शारीरिक श्रम आणि वेळ कमी होतो.◼️ आकारहे यंत्र एकसारख्या आकाराचे आणि लांबीचे लाकूड तयार करू शकते, ज्यामुळे ते अंत्यसंस्कार विधींसह विविध अनुप्रयोगांसाठी योग्य बनतात.◼️ कृषी कचऱ्याचा वापरहे यंत्र इतर कृषी-कचरा सामग्रीवर देखील प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे संसाधनांचा वापर आणखी वाढतो.◼️ अनुदान उपलब्धताकेंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेतून या यंत्रास ५० टक्के म्हणजेच रुपये ४२,०००/- एवढे अनुदान देय आहे.

- श्री. विष्णू साळवेसेवानिवृत्त कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे7038526959/7588078456

अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?

English
हिंदी सारांश
Web Title : New Self-Employment Opportunity in Rural Areas: Cow Dung Wood Production

Web Summary : Cow dung wood production offers a solution to deforestation. A machine processes dung, sawdust, and dry grass into usable wood. This eco-friendly alternative reduces waste, lowers carbon footprint, and provides income for farmers. Subsidies are also available for the machine.
टॅग्स :गायमहिलाव्यवसायशेतकरीशेती