Join us

Dudha Anudan : दूध उत्पादकांना प्रोत्साहन; अनुदान मिळाले अन् सारं घर आनंदानं न्हालं..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:49 IST

Dudha Anudan : पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे. वाचा सविस्तर

पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्या तुलनेत गायीच्याCow दुधासmilk अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी, दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील दोन हजार ८७५ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अनुदान मिळाल्याने दूध उत्पादकांत आनंद व्यक्त होत आहे.

शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने पशुपालन कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत गावातच पुरेशा प्रमाणात दूध उपलब्ध होत नाही.

शेतीला जोड व्यवसाय व्हावा तसेच दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे पशुधनवाढीस मदत होत आहे. दरम्यान, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे भाव उतरतात. याशिवाय, दुधाच्या अतिपुष्ट काळातही दर कोसळतात. त्यामुळे ही योजना राबविण्यात आली.

लिटरला किती अनुदान?

सहकारी दूध संघ व स्वासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकयांना प्रतिलिटर ५ रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील २ हजार ८७५ दूध उत्पादकांना लाभ...

• जिल्हा दूध संघ, साबरकंठा (अमोल) आणि मदर डेअर अशा तीन दुग्ध संस्था आहेत.

• जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिलिटर ५ रुपये प्रोत्साहन अनुदानाची योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ हजार ८७५ शेतकऱ्यांचे ९ लाख ६९ हजार ९२३ लिटर दूध संकलित झाले. अनुदानापोटी ४८ कोटी ४९ लाख ६१५ रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

असे मिळेल अनुदान

जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी ५ रुपये प्रतिलिटर प्रोत्साहन अनुदान होते. आता ७ रुपये प्रतिलिटर अनुदान दिले जाणार आहे.

अनुदानाचा लाभ कोणाला मिळतो?

ही योजना केवळ राज्यातील दूध उत्पादकांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ गायींची नोंदणी शासनाच्या पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे.

म्हशीच्या दुधाला अनुदान मिळते का?

गायीच्या दुधास कमी मागणी असते. शिवाय, दरही कमी असतो. म्हशीच्या दुधाला अधिक दर असल्याने शासनाकडून प्रोत्साहन अनुदान दिले जात नाही.

दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान...

अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील गायीच्या दूध उत्पादकांची माहिती ऑनलाइन सादर करण्यात आली. लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा होत आहे.

शेतकऱ्यांना होतोय लाभ

दूध उत्पादनवाढीसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रोत्साहन योजनेपोटी जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर ४८ कोटी ४९ लाख ६१५ रुपये जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - एम. एस. लटपटे, सहायक निबंधक,सहकारी संस्था (दूध).

हे ही वाचा सविस्तर :  Animal Feed Business : पशुखाद्य व्यवसाय सुरु करायचाय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रदूधदूध पुरवठाशेतकरीगायशेती