Join us
Daily Top 2Weekly Top 5

Animal Winter Care : हिवाळ्यात जनावरांना किती वेळा पाणी द्याल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:17 IST

Animal Winter Care : शरीरातील पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील अनेक कार्ये असंतुलित होतात.

Animal Winter Care : मनुष्यासह पशूंना पाणी दैनंदिन जीवनातील हा महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे शरीराचा समतोल राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे असते. सध्या थंडीचे दिवस असल्याने या दिवसांत पाण्याचा वापर (Water) कमी होतो. जसे मनुष्यासाठी पाणी महत्वाचे असते तसेच जनावरांसाठी देखील. 

शरीरातील पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील अनेक कार्ये असंतुलित होतात. त्यामुळे जनावरांना देखील वेळच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. हिवाळ्यात जनावरांसाठी पाणी नियोजन कसे करायचे? जाणून घेऊयात... 

पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा! 

  • हिवाळ्यात थंडीमुळे गाई, म्हशींना तहान कमी लागते. 
  • कमी पाणी पिल्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो. 
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध असल्याची खात्री करावी. 
  • हिवाळ्यामध्ये युरोपातील देशांत गाईंना कोमट पाणी पिण्यास दिले जाते, याचा पाणी पिण्यावर व दूध उत्पादनात अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. पाण्याची टाकी नियमित स्वच्छ ठेवावी. 
  • पाण्याचा टाकीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. 
  • गाईंना भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी आहारात कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. 
  • खाद्यात मिठाचे प्रमाण योग्य आहे, याची खात्री करावी.

 

पाणी व्यवस्थापन करण्यासाठी : 

  • जनावरांना नेहमी स्वच्छ, ताजे आणि निर्जंतुक पाणी द्यावे.
  • पाण्याचे तापमान १६ ते २६ अंश सेल्सिअस असावे.
  • दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे.
  • उन्हाळ्यात जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चारवेळा दिल्यास जनावरे अधिक दूध देतात.
  • स्तनपान देणाऱ्या गाईंना कोरड्या गाईंच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाणी लागते.
  • थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात डुबु देणे उपयुक्त ठरते.
  • गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे.
  • गोठयामध्ये अधूनमधून पाणी फवारावे.
  • पाण्यामुळे जनावरांच्या शरीराची लवचिकता राहते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायगायथंडीत त्वचेची काळजी