Join us

Goat Farming : उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेळ्यांना काय खायला द्यावे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:31 IST

Goat Farming : वाढत्या तापमानामुळे (Temperature) अनेकदा शेळ्यांना उष्म्याचा त्रास (High Temperature) होण्याची शक्यता असते.

Goat Farming :  उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे (Temperature) अनेकदा शेळ्यांना उष्म्याचा त्रास (High Temperature) होण्याची शक्यता असते. या काळात शेळ्यांच्या खाद्य व्यवस्थापनावर लक्ष देणे आवश्यक असते.

शेळ्यांना आवश्यक पोषक तत्वे आणि पाणी व्यवस्थित मिळावे, यासाठी विशेष काळजी घेणे. उन्हाळ्यात शेळ्यांना हिरवा चारा, वाळलेला चारा, खुराक आणि पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक असते. 

उन्हाळ्यातील शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन : 

  • शेळ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या दैनंदिन आहारात सकस हिरव्या चाऱ्याचा आविर्भाव असावा. 
  • प्रत्येक मोठ्या शेळीस ३ ते ५ किलोग्राम हिरवा चारा मिळेल, असे नियोजन उन्हाळ्याआधीच करून ठेवावे. 
  • त्यासोबतच २०० ते ३०० चांगल्या प्रतीचे पशुखाद्यही पुरविण्यात यावे. 
  • हिरवा चारा कमी उपलब्ध असल्यास हिरवा-सुका चारा आणि पशुखाद्य सोबत मिसळून ओले मिश्रण तयार करून संमिश्र खाद्य दिल्यास त्यांचे खाद्य सेवन वाढते. चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण हे ५०:५० असावे. 
  • उपलब्ध असलेला हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांस वाढीसाठी आवश्यक घटक चाऱ्यातून मिळत नाहीत. 
  • त्यामुळे चाऱ्यामध्ये इतर घटक जसे क्षार मिश्रण, जीवसत्वे, प्रोबायोटिक्स यांचा वापर करावा. 
  • बंदिस्त शेळीपालनातील शेळ्यांना दिला जाणारा दैनंदिन आहार हा ३ ते ४ भागात विभागून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी देण्यात यावा.
  • शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेळीपालनकृषी योजनाशेती क्षेत्रदुग्धव्यवसाय