Join us

Goat Farming : 30 किलो वजनाच्या शेळीला काय खायला द्यावे? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:11 IST

Goat Farming : शेळीपालन (Sheli Palan) व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो.

Goat Farming : शेळीपालन (Sheli Palan) व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो. शेळ्यांच्या उत्तम वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम प्रजनन व दुध उत्पादनासाठी उर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे व पाणी यासारख्या पोषक घटकांची संतुलित प्रमाणात आवश्यकता असते. शेळ्यांच्या आहारात (Diet) कोणते घटक असणे महत्वाचे आहे, हे जाणून घेऊयात.... 

चारा (रफेजस) : शेळ्यांना आवश्यक असणारा हिरवा व कोरडा चारा यास रफेजस म्हणतात.चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. चारा हा दोन प्रकारचा असतो. सुका अथवा वाळलेला : उदा. ज्वारीचा कडबा, बाजरीचे सरमाड, वाळलेला वेल. हिरवा चारा : हिरवा मका/ ज्वारीची वैरण, हिरवा झाडपाला, हिरव्या चाऱ्यातून क्षार, खनिजे, जीवनसत्वे मिळतात.पशुखाद्य : हिरवा चारा आणि सुका चारा यामधून पोट भरण्यासाठी पुरेसे खाद्य मिळते. थोडी, प्रथिने, क्षार, खनिजे व जीवनसत्वेही मिळतात आणि महत्वाचे म्हणजे तंतूमय पदार्थांची गरज त्यातून भागविली जाते. मात्र शेळीस तिच्या गरजेइतकी सर्व पोषक योग्य प्रमाणात मिळण्यासाठी पशुखाद्याची आवश्कयता असते. 

साधारणपणे ३० किलो वजनाच्या शेळीला कसा आहार दिला जातो.. 

चाऱ्याचे प्रमाण : 

हिरवा चारा : ३ ते ४ किलोवाळलेला चारा : ०.५ ते १ किलो.पशुखाद्य : २५० ग्रॅ ते ३०० ग्रॅ.

याशिवाय वाढत्या वयातील करडांसाठी, माजावर येणाऱ्या शेळ्यासाठी आणि गाभण असलेल्या शेळ्यांसाठी आवश्यकतेनुसार संतुलित आहार देणे आवश्यक आहे.

डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक  

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रकृषी योजनाशेतीदुग्धव्यवसाय