Agriculture News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या माध्यमातून देवणी व होलदेव संकरीत जनावरांचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्प, वलसा डेअरी येथे हा लिलाव पार पडणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना या लिलावात सहभागी व्हायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी काही नियम व अटी ठरवून देण्यात आलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...
- १) लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस लिलावापुर्वी प्रथम ४ हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलावात भाग घेता येईल. अनामत रक्कम संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच परत मिळेल.
- २) लिलावात उच्चतम बोलीवर म्हणेजच जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीच्या नावावर लिलाव सोडला जाईल.
- ३) लिलाव सुटलेल्या व्यक्तीस बोली प्रमाणे संपूर्ण रक्कम तात्काळ भरावी लागेल. तसे न झाल्यास सदरील व्यक्तीची अनामत रक्कम जप्त होईल.
- ४) पूर्ण रक्कम भरूनच जनावर ताब्यात देण्यात येईल.
- ५) एखाद्या जनावराची बोलीची किंमत समितीस कमी आहे असे वाटल्यास त्या जनावराचा फेर लिलाव करण्यात येईल किंवा अपेक्षेप्रमाणे किंमत न आल्यास त्या जनावराचा लिलाव रद्द करणे इत्यादी अधिकार संबंधीत लिलाव समितीकडे राहतील.
- ६) लिलाव संबंधीचे इतर सर्व अधिकार लिलाव समितीकडे राखुन ठेवलेले आहेत.
- ७) लिलावात भाग घेणारी व्यक्ती शेतकरी / पशुपालन व्यवसायातील असावी.
लिलावाचे ठिकाण आणि तारीख संकरीत गो-पैदास प्रकल्प, (वलसा डेअरी) व.ना.म.कृ.वि.परभणी.दि. २५ फेब्रुवारी २०२६ बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता
English
हिंदी सारांश
Web Title : Deoni, Holdev Crossbreed Cattle Auction: Date and Location Announced
Web Summary : Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, organizes an auction of Deoni and Holdev crossbreed cattle on February 25, 2026, at Valsadairy. Farmers must deposit ₹4000 beforehand. The highest bidder wins, paying immediately. The committee reserves the right to re-auction or cancel if prices are unsatisfactory.

Web Title : देवणी, होलदेव संकरित पशु नीलामी: तिथि और स्थान घोषित
Web Summary : वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय, परभणी, 25 फरवरी, 2026 को वलसाडेयरी में देवणी और होलदेव संकरित पशुओं की नीलामी आयोजित करता है। किसानों को पहले ₹4000 जमा करने होंगे। उच्चतम बोली लगाने वाला तुरंत भुगतान करता है। समिति को कीमतों के असंतोषजनक होने पर फिर से नीलामी करने या रद्द करने का अधिकार है।