Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat-Poultry Farming : शेळ्यांसोबत करा कुक्कुटपालन, खर्च कमी, उत्पन्नाची दुप्पट हमी 

Goat-Poultry Farming : शेळ्यांसोबत करा कुक्कुटपालन, खर्च कमी, उत्पन्नाची दुप्पट हमी 

Latest News poultry with goat farming is very beneficial for farmers cost decrease and income increase | Goat-Poultry Farming : शेळ्यांसोबत करा कुक्कुटपालन, खर्च कमी, उत्पन्नाची दुप्पट हमी 

Goat-Poultry Farming : शेळ्यांसोबत करा कुक्कुटपालन, खर्च कमी, उत्पन्नाची दुप्पट हमी 

Goat-Poultry Farming : शेतकऱ्यांनी शेळ्यांसोबत कोंबड्या पाळल्यास (Goat-Poultry Farming) अधिक नफा मिळण्याची हमी असते. 

Goat-Poultry Farming : शेतकऱ्यांनी शेळ्यांसोबत कोंबड्या पाळल्यास (Goat-Poultry Farming) अधिक नफा मिळण्याची हमी असते. 

शेअर :

Join us
Join usNext

Goat-Poultry Farming : पशुपालन  (Poultry Farming) हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी व्यवसाय आहे. पशुपालनातून दूध, खत आणि इतर कृषी उत्पादन मिळवता येतात. शेळीपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कारण ते अनेक लोकांसाठी उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. यातही शेतकऱ्यांनी शेळ्यांसोबत कोंबड्या पाळल्यास (Goat-Poultry Farming) अधिक नफा मिळण्याची हमी असते. 

अनेक शेतकरी अजूनही गायी, म्हशी आणि शेळ्यांसोबत कोंबडी पाळत आहेत. शेळीच्या लेंड्या आणि कोंबडीची विष्ठा वापरून शेतीसाठी खत तयार होऊ शकते. अशा प्रकारे पशुपालक कमी खर्चात चांगला नफा मिळवू शकतात. त्यामुळे शेळी पालनासोबत कुक्कुटपालन करणे सोयीस्कर ठरू शकते. 

असे करा शेळी-कोंबडी पालन 
कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठी, सर्वप्रथम शेड तयार करावे लागेल. या शेडमध्ये कोंबड्या आणि शेळ्या एकत्र राहू शकतात. या शेडचे दोन भाग करण्यासाठी मधोमध लोखंडी जाळी लावून कोंबड्यांना बाहेर येण्यासाठी छोटा दरवाजा करावा. शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर घेऊन शेडमध्ये साफसफाईसाठी जाताना जाळीत बसवलेले छोटे गेट असले पाहिजे. गेट उघडल्यानंतर कोंबड्या शेळ्यांच्या जागी येतात. शेळ्यांना शेडमध्ये उरलेला चारा असतो, तोच चारा कोंबड्या खात असतात.

कोंबड्यांना खाद्य लागणार नाही 
शेळ्यांना बरसीम, कडुनिंब, जांभूळ आणि पेरू या झाडांचा पाला चारा म्हणून आवश्यक असतो. हा चारा हिरवा आणि औषधीयुक्त असल्याने शेळ्यांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. हा सर्व चारा शेळ्या खात असतात, मात्र शेळ्या बालहर आल्यानंतर उर्वरित चारा तसाच असतो, तोच चारा कोंबड्यांना खाऊ घालता येतो. त्यामुळे कोंबड्यांचे वेगळे खाद्य बाजारातून आणावे लागत नाही. कोंबडी एका दिवसात 110 ते 130 ग्रॅम धान्य खाते. त्याचबरोबर कोंबड्या आणि शेळ्यांचे पालन केल्याने कोंबडीच्या खाद्याचा खर्च 30 ते 40 ग्रॅमने कमी होतो.

लेंडीपासून कंपोस्ट खत 
एक एकरावर शेळ्यांसोबत कोंबड्या पाळल्या तर शेळ्यांच्या खतापासून कंपोस्ट खतही तयार करता येईल. हे तयार केलेले कंपोस्ट तुम्ही शेळ्यांसाठी चारा वाढवण्यासाठी वापरू शकता. किंवा स्वतःच्या शेतीसाठी देखील वापर करता येऊ शकतो.

Web Title: Latest News poultry with goat farming is very beneficial for farmers cost decrease and income increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.