नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव होत असतात. स्थानिक आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून जनावरांच्या खरेदी-विक्री बाजाराचा शुभारंभ झाला असल्याची माहिती सभापती सिंधूताई सोनवणे यांनी दिली.
धान्य, भुसार माल, कांदा, डाळिंब यांच्या लिलावासोबतच पशुपालकांना जनावरे खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र सुविधा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना जनावरे विक्रीसाठी नामपूर किंवा देवळ्याला जावे लागणार नाही.
ठेंगोडा शिवारातील समितीच्या जागेवर हा बाजार भरवला जाणार असून, जनावरांसाठी निवारा शेड, पाणी, पार्किंग व व्यापाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्याचे बाजारभाव काय चालु आहेत?
गायीचे बाजारभाव पाहिले तर आज भोर बाजारात नंबरच्या गायीला कमीत कमी १० हजार रुपये तर सरासरी ३५ हजार रुपये दर मिळाला. भिवंडी बाजारात बकऱ्याला सरासरी ४ हजार ५०० रुपये, पलूस बाजारात बोकडाचे दर सरासरी ४ हजार ५०० रुपये, नंबर १ च्या म्हशीला कमीत कमी २० हजार रुपये तर सरासरी ४० हजार रुपये दर मिळाला.