Goat Winter Care Tips : बऱ्याच आजारांचे प्रमुख कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि परजीवींचा प्रादुर्भावामुळे थंडीमध्ये आजार लवकर पसरतात. कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्तवेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून एक-दोनवेळा धुऊन घ्यावा. बाह्य परजीवींची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते.
हिवाळ्यातील आरोग्य व्यवस्थापन
- आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी गवतावर दव असताना सकाळी सोडू नये.
- कारण या वेळेत जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
- करडांना आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले.
- म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत.
- शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.
- हिवाळ्यात करडांवरील पिसू, गोचिड यांचे योग्यवेळी नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- अन्यथा, हे करडांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात.
- यामुळे करडू अस्वस्थ होते आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते.
- त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते आणि करडू शरीरावर तोंडाने चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होणे इ. घडते.
- उवाए पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा.
- संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.
- नवजात कोकरे व मेंढ्यांचे थंडी पासून संरक्षण करावे. योग्य निवाऱ्याची सोय करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
