Join us

Goat Farming : अधिक तापमान अन् पावसाचा काळ, शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:39 IST

Goat Farming : मे आणि जूनमध्ये शेळ्या-मेंढ्याच्या व्यवस्थापनात (Sheli Mendhi Vyavsthapan) विशेष लक्ष देण्याची गरज असते.

Goat Farming :  मे आणि जूनमध्ये शेळ्या-मेंढ्याच्या व्यवस्थापनात (Sheli Mendhi Vyavsthapan) विशेष लक्ष देण्याची गरज असते, कारण या काळात तापमान वाढते आणि पावसाला (Rain Season) देखील सुरवात होत असते. या काळात शेळ्यांसाठी योग्य निवारा, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, हे समजून घेऊयात.... 

मे-जूनमधील शेळ्यांतील व्यवस्थापन

  • कमी उत्पादन देणाऱ्या व प्रजननाचे विकार असलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात. 
  • (एकूण संख्येच्या २० टक्के). त्यांच्या जागी नवीन जातिवंत व चांगल्या शेळ्या निवडाव्यात.
  • नवीन पैदाशीचे बोकड निवडावेत.
  • शेळ्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर लक्ष ठेवावे.
  • शेळ्यांच्या प्रजननाची व पैदाशीची तयारी करावी.

मे-जूनमधील मेंढ्यांतील व्यवस्थापन

  • मेंढ्यांच्या वाड्यामधील मातीचा थर बदलून घ्यावा.
  • मेंढ्यांना जुलाब व उष्माघातापासून संरक्षण करण्याकरिता उपाययोजना कराव्यात.
  • मेंढ्या माजावर येण्याकरिता मेंढ्यांना पौष्टिक आहार द्यावा.
  • प्रती मेंढी १० ग्रॅम खनिज मिश्रण आणि १० ग्रॅम मीठ खाद्यातून द्यावे.
  • सर्व मेंढ्यांना पी.पी.आर. रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. 
  • (सदर लस ही तीन वर्षांतून एकदाच द्यायची असते)

-ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी जि. नाशिक 

टॅग्स :शेळीपालनदुग्धव्यवसायशेतीशेती क्षेत्रपाऊस