Join us

Goat Farming Guide : शेळीच्या गाभण काळात 'या' गोष्टी हमखास लक्षात ठेवा,  वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:22 IST

Goat Farming Guide : गाभण शेळीचे शेवटचे काही दिवस अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. याच कालावधीत गर्भाची जास्तीत जास्त वजनवाढ होत असते.

Goat Farming Guide : शेळीचा गाभण काळ साधारणपणे 145 ते 155 दिवस असतो. मात्र, जाती, कचरा वजन, वातावरण आणि समता यामुळे हा कालावधी बदलू शकतो.  त्यातही शेवटचे काही दिवस अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. कारण याच कालावधीत गर्भाची जास्तीत जास्त वजनवाढ होत असते. त्यानुसार गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी? हे जाणून घेऊयात... 

असा असतो गाभण काळ 

  • शेळीचा गाभण काळ ५ महिने असतो.
  • गाभण शेळ्यांची वेगळ्या गोठ्यात व्यवस्था करावी.
  • चरावयास लांबवर पाठवू नये.
  • वारंवार हाताळू नये/मारझोड करू नये.
  • प्रतिकुल हवामानापासून संरक्षण करावे.
  • गाभण काळातील गर्भाची बहुतेक ७५ ते ९० टक्के वाढ शेवटच्या सहा आठवडयात होते. त्यामुळे या काळात शेळीच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.
  • शेळी दुध देत असेल तर ते हळूहळू आटविण्याचा प्रयत्न करावा.
  • शेळी विण्यापुर्वी चार-पाच दिवस आधी वेगळया ठिकाणी बांधांवी व खाली जमिनीवर गवताचा तीन-चार इंचाचा थर अंथरावा.

या गोष्टींची काळजी घ्यावी 

  • गाभण शेळ्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी.
  • त्यांना आवश्यकतेनुसार ओला, सुका चारा द्यावा.
  • त्यांना स्वच्छ, निर्जंतुक पाण्याची २४ तास सोय करून द्यावी.
  • उन्हाळ्यात शेळ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
  • गाभण शेळ्यांना योग्य पोषण देणे निरोगी आई आणि बाळासाठी महत्त्वाचे आहे.
  • पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा.
  • व्यायच्या आधी दोन-तीन दिवस शेळीला चरायला बाहेर सोडू नये.
  • व्यायच्या अगोदर शेळीच्या शेपटीवरील व मांडीवरील केस कात्रीने कापावेत.

 

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनकृषी योजनाशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय