Join us

Goat Farming Guide : पैदाशीकरीता शेळ्यांची आणि बोकडांची निवड कशी कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 20:11 IST

Goat Farming Guide : पैदाशीकरीता शेळ्यांची आणि बोकडांची निवड (Sheli Palan) करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. 

Goat Farming Guide : शेळीपालन व्यवसायाचे (Goat Farming) यश पैदाशीसाठी वापरलेल्या शेळी आणि बोकडावर अवलंबून असते. शेळीपालनात पैदाशीसाठी नराची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड करणे चांगले असते. त्यामुळे पैदाशीकरीता शेळ्यांची आणि बोकडांची निवड (Sheli Palan) करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. 

अ) पैदाशीकरिता शेळ्यांची निवड

  • जातीची सर्व लक्षणे बरोबर असावीत, शक्यतो त्यांच्यामध्ये उभयगुण (मांस आणि दुध) असावेत.
  • सरासरी वय एक वर्षाचे पुढे, वजन ३०३२ किलोच्या पुढे असावे.
  • मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसावा, अशा माद्या द्विलिंगी असू शकतात व पैदाशीकरीता निरोपयोगी असतात.
  • कपाळ रुंद असावे.
  • मान लांब आणि पातळसर असावी.
  • डोळे तरतरीत असावे.
  • पाठ मानेपासून शेपटापर्यंत शक्यतो सरळ असावी, बाक नसावा. पाठीमागुन पाहिल्यावर मांड्यात भरपुर अंतर असावे.
  • योनीमार्ग स्वच्छ असावा.
  • कास मोठी आणि लुशलुशीत, दोन्ही सह एकाच लांबीचे आणि जाडीचे, दुध काढल्यावर लहान होणारे असावे.
  • नियमितपणे माजावर येणारी, न उलटणारी, सशक्त, निरोगी, जुळी पिल्ले देणारी, जास्त दुध देणारी, स्वःच्या करडांविषयी मातृत्वाची भावना असणारी शेळी निवडावी..

 

ब) पैदाशीकरिता बोकडाची निवड

  • जातीची सर्व लक्षणे बरोबर असावीत.
  • पाय मजबूत आणि खुर उंच असावेत. चारही पायांवर चांगली चाल असावी.
  • सदृढ बांधा, वयाप्रमाणे उत्त्म वाढ असावी.
  • निकोप निरोगी तरतरीत नजर, उभार डोके, सरासरी वय एक वर्षाच्या पुढे आणि वजन ३० किलोच्या पुढे असावे.
  • माजावर आलेली शेळी त्वरीत भरविण्याची क्षमता असावी.
  • एकदा भरवलेल्या शेळ्या परत न उलटणे, त्यापासूने जन्मास आलेली करडे सशक्त निपजणे ही सर्व चांगल्या बोकडाची लक्षणे आहेत.

 

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र मेंढी व विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीशेतकरीदुग्धव्यवसाय