Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming : शेळ्यांसाठी चाऱ्याचे 'हे' बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : शेळ्यांसाठी चाऱ्याचे 'हे' बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goat Farming Best fodder options for goats, know in detail | Goat Farming : शेळ्यांसाठी चाऱ्याचे 'हे' बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : शेळ्यांसाठी चाऱ्याचे 'हे' बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : जनावरांच्या आहारामध्ये ७० टक्के भाग चाऱ्याचा असून त्यामध्ये वाळलेल्या व ओल्या चाऱ्याचा अंतर्भाव असतो.

Goat Farming : जनावरांच्या आहारामध्ये ७० टक्के भाग चाऱ्याचा असून त्यामध्ये वाळलेल्या व ओल्या चाऱ्याचा अंतर्भाव असतो.

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farming : पशुपालनामध्ये चारा पिकांना (Dairy farming) विशेष महत्व आहे. जनावरांच्या आहारामध्ये ७० टक्के भाग चाऱ्याचा असून त्यामध्ये वाळलेल्या व ओल्या चाऱ्याचा अंतर्भाव असतो. हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्रिग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. हिरव्या चाऱ्यातील ही घटकद्रव्ये विद्राव्य स्वरुपात असतात व ती सहज उपलब्ध होतात. 

जनावरांच्या आहारात (Animal Feed) हिरवा व वाळलेला चारा Green Fodder), खुराक, खनिजमिश्रणे, पाणी यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे असते. हिरवा चाऱ्यासाठी महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वारी, मका, बाजरी, चवळी, लसूणघास, संकरित, नेपिअर, गिनी गवत इत्यादी चारा पिके घेतली जातात. त्याचबरोबर अलीकडे ओट, बरसीम, दिनानाथ, दशरथ, यासारखी चाऱ्याची पिके व गवते देखील काही भागात घेतली जातात. 

1) मका : मका हे तृणवर्गातील वर्षभर घेतले जाणारे हिरव्या चाऱ्याचे महत्वाचे पीक आहे. मका या पिकास चारा पिकांचा राजा म्हणून संबोधतात.
सुधारित वाण : आफ्रिकन टॉल, गंगासफेद, मांजरी कंपोझीट.
जमीन, हवामान व पूर्वमशागत : एक खोल नांगरट करुन एक ते दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन मऊ व भुसभुशीत करुन पेरणी करावी.
बियाणे व पेरणी : पेरणीसाठी प्रती हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे, पेरणी पाभरीच्या सहाय्याने दोन ओळीत ३० से.मी. अंतरावर करावी.
खतव्यवस्थापन : पेरणीसाठी हेक्टरी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी हेक्टरी ५० किलो नत्र (१०८ किलो युरिया), ५० किलों स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ५० किलो पालाश (८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो (१०८ किलो युरिया) द्यावा.
आंतरमशागत : आरंभीच्या काळात एक खुरपणी व एक कोळपणीद्वारे शेतातील पीक तण विरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन : खरीप हंगामात गरज असल्यास रोपावस्था व तुराबाहेर पडण्यापूर्वी दोन पाण्याच्या पाळ्या १५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळी हंगामात १० ते १२ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या आणि उन्हाळी हंगामात ८ ते १० दिवसांच्या अंतराने ७ ते ८ पाळ्या द्याव्यात.
कापणी व उत्पादन : मक्याचे चारा पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापावे. शिल्लक राहिलेल्या चाऱ्याापासून मुरघास करावा. हिरव्या चाऱ्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी ४५० ते ६०० क्विंटल आहे.

2) बरसीम / लुसर्ण : हे रब्बी हंगामातील प्रमुख व महत्वाचे हिरव्या चात्याचे व्दिदल वर्गीय पीक असून सर्व साधारणपणे मेथीसारखे दिसते. या पिकास घोडा घास असेही म्हणतात. या पिकापासून मिळणाऱ्या ३ ते ४ कापण्यांपासून भरपूर हिरवा चारा उपलब्ध होतो. चारा रुचकर, पालेदार, सकस व चविष्ट असतो.
सुधारित वाण : मेस्कावी जे.बी-१, जे.एच.बी.-१४६ हे बरसिमचे तसेच रिससा-९, आनंद-२ हे लुसर्णचे सुधारित वाण आहे.
जमीन व हवामान : या पिकास मध्यम ते भारी प्रतीची व पाण्याचा योग्य निचरा होणारी भुसभुशीत जमिन चांगली मानवते. हे पीक क्षारयुक्त जमिनतही चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते. या पिकास थंड ऊबदार हवामानाची गरज असते.
पूर्वमशागत : एक नांगरणी व कुळवणी करुन जमीन भुसभुशीत करावी. अगोदरच्या पिकांची धसकटे वेचून घ्यावी व आवश्यकतेनुसार जमीन सपाट करुन वाफे करावेत.
खतव्यवस्थापन : पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम जिवाणूसंवर्धक खत २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. पेरणी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसत्या आठवड्यापर्यंत करावी. हेक्टरी ३० किलो बियाणे ३० सें.मी. अंतराच्या ओळीत पेरावे अथवा ५ x ३ मी. आकाराच्या वाफ्यात वी हाताने फेकून पेरणी करावी.
आंतरमशागत : या पिकात सुरुवातीलाच एक किंवा दोन खुरपण्या/ निंदण्या करणे फायद्याचे ठरते.
पाणी व्यवस्थापन  : १० दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात.
कापणी व उत्पादन : पहिली कापणी साधारणतः पेरणीपासून ४५ ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापणी साधारणतः २१ ते ३५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे ४ ते ५ कापण्या घेणे शक्य होते. ४ ते ५ कापण्याद्वारे हेक्टरी सरासरी एकूण ६५० ते ८०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

3) गिनीगवत : गिनीगवत बहूवार्षिक, झुपक्या झुपक्याने २ ते ३ मीटर उंच व सरळ वाढणारे गवत आहे. त्याची पाने लांब व रुंद असतात. पाण्याचे पाट, बांधाच्या कडेने, उताराच्या जमिनीवर हे गवत लावल्यास जमिनीची धूप थांबते व हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही मिळते.

जमीन व हवामान : मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमिन योग्य आहे. थंड व उबदार वातावणात या गवताची वाढ जोमाने होते.
पुर्वमशागत : खोल नांगरट करून कुळवाची पाळी देऊन जमिन भुसभुशीत करावी.
बियाणे व लागवड : मार्च ते जूलै महिन्यात सत्यावर गिनी गवताची लागवड करावी. एका ठिकाणी दोन ठोंब लावावेत. त्यासाठी ५० हजार ठोंबे प्रती हेक्टरी लागतात.
खत व्यवस्थापन : हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावे. त्याचप्रमाणे हेक्टरी २५ किलो नत्र वे २० किला पालाश (३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) लागवडीच्या वेळी दयावे. कापणीनंतर हे २५ कि, नत्र (५४ कि. नत्र युरिया) दयावा.
आंतरमशागत : लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी करावी. त्यानंतर गरजेप्रामणे खुरपणी किंवा पाळ्या दयाव्यात.
कापणी व उत्पादन : गिनीगवताची पहिली कापणी लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३० दिवसांच्या आंतराने कराव्यात. अशा प्रकारे वर्षभरात ७ ते ८ कापण्या मिळतात व १४०० ते १६०० क्लिंटल प्रति हेक्टर चारा मिळतो.

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र मेंढी व विकास महामंडळ, नाशिक 

Web Title: Latest News Goat Farming Best fodder options for goats, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.