Join us

Gay Kharedi : दूध व्यवसायासाठी गाय खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासून घ्या, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:17 IST

Gay Kharedi : गाय खरेदी (Cow Buying) करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Gay Kharedi :  शेती आणि दूध व्यवसाय (Milk Business) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाय खरेदी करणे क्रमप्राप्त ठरते. कारण दूधव्यवसायात अधिक दूध देणाऱ्या गायी असणे आवश्यक असते.  

जर गायींचे संगोपन योग्यरित्या केले तर ते चांगल्या दूध उत्पादनासाठी (Milk Production) फायदेशीर ठरू शकते. पण गाय खरेदी (Cow Buying) करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये.

गायीच्या जातीची निवडगायीच्या जातीची निवड करणे खूप महत्वाचे आहे. वेगवेगळ्या जातीच्या गायी वेगवेगळ्या प्रकारचे (Milk) दूध देतात. त्यांचे आहार व्यवस्थापन देखील वेगवेगळे पाहायला मिळते. उदाहरणार्थ, हिरवाल आणि सहरीवाल सारख्या जाती उच्च दर्जाचे दूध देतात. तुम्ही गाय कोणत्या उद्देशाने खरेदी करत आहात, ही गोष्ट ध्यानात घेऊन गायीच्या जातीची निवड करा. 

गायीचे वय आणि आरोग्यगे खरेदी करत असताना गायीचे वय किती आहे तपासून घेतले पाहिजे. साधारणपणे, २ ते ५ वर्षांच्या गायी सर्वात योग्य असतात. कारण या वयात गायीचे दूध उत्पादन जास्त असते आणि ते जास्त काळ दूध देण्यास सक्षम असतात. गाय खरेदी करण्यापूर्वी तिची संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी. गायीला कोणत्याही प्रकारच्या आजारापासून किंवा संसर्गापासून वाचवणे आवश्यक असते. अशावेळी पशुवैद्यकाकडून आरोग्य तपासणी करून घेणे.

दूध उत्पादन क्षमतागायींच्या संगोपनासाठी दूध उत्पादन क्षमता हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. जर तुम्ही दूध उत्पादनासाठी गाय खरेदी करत असाल तर तिच्या दूध देण्याच्या क्षमतेचे योग्य मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. नियमितपणे जास्त दूध देणारी गाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. यासाठी, तुम्ही गायीच्या दूध उत्पादनाची नोंद म्हणजेच मागील पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चाऱ्याची उपलब्धतागाय निरोगी ठेवण्यासाठी, तिच्या योग्य आहार योजनेची काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक गायीला तिच्या आयुष्यभर पोषण करण्यासाठी चांगला चारा आणि गवताची आवश्यकता असते. प्रथम खात्री करा की, तुमच्याकडे गायीसाठी योग्य चारा आणि गवत उपलब्ध आहे. तुम्ही तिला सातत्याने आणि योग्य प्रमाणात खायला देऊ शकाल. याशिवाय, गायीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा देखील असावा.

गायीचा स्वभाव जाणून घ्या.... गायीचा स्वभावही खूप महत्त्वाचा असतो, काही गायी शांतताप्रिय आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या असतात तर काही गायी हट्टी आणि आक्रमक असू शकतात. अशा परिस्थितीत, गायीची मानसिक स्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही तिच्यासोबत चांगले काम करू शकाल. विशेषतः जर गाय तुमच्यासोबत बराच काळ राहणार असेल तर तिचा स्वभाव जाणून घेणे महत्वाचे आहे. 

Bail Bajar : गुरांच्या बाजारात बैलजोडी, गाई- म्हशींची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :गायशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायदूधव्यवसाय