Join us

दुभत्या गाई, म्हशींची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी 'या' गोष्टी करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:30 IST

Dudh Utpadan : दुभत्या गाई-म्हशींची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या करणे महत्त्वाचे आहे.

Dudh Utpadan : दुभत्या गाई-म्हशींची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यवस्थापन आणि चांगल्या जातीची निवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जनावरांचे आरोग्य जपणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि पशुवैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. संतुलित आहारामुळे दूध उत्पादन आणि फॅटमध्ये वाढ होते. 

देशी गाय किंवा मिश्र पैदास केलेल्या गाई तसेच म्हशींपैकी कुठल्याही जाती आपण दूध उत्पादनासाठी निवडल्या तरीही त्यांची दूध उत्पादनक्षमता तपासून पाहावी. चांगल्या गुणवत्तेची दुधाळ जनावरे आपल्या गोठ्यात आणली तर पुढील पैदास चांगली होईल. 

सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्टेड सीमेन, एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम उत्पादनक्षमता असलेल्या प्रजाती तयार करून योग्य पैदास धोरण, उत्तम पशू आहार, राहण्याची उत्तम व्यवस्था व आरोग्य काळजी यामुळे जनावरांची पूर्ण उत्पादनक्षमता वापरता येईल.

शेळ्यांची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो तो हिवाळ्यात सुरू करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पावसाळ्यात चारा लागवड करून चारा खाण्यायोग्य झाला की हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेती क्षेत्रगायदूधशेती