Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dairy Farming Innovation : उकाड्याला रामराम! म्हशींसाठी स्विमिंग पूल बनवून शेतकऱ्यानी केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:15 IST

Dairy Farming Innovation : राज्यात उकाड्याचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने जनावरांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून हिंगोलीतील एका शेतकऱ्याने भन्नाट कल्पना राबवत आपल्या म्हशींसाठी चक्क स्विमिंग पूल उभारला आहे. या अनोख्या प्रयोगामुळे म्हशींना उष्णतेपासून दिलासा मिळत असून दूध उत्पादनही स्थिर राहण्यास मदत होत आहे. (Dairy Farming Innovation)

रमेश वाबळे

राज्यात तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने उकाड्याने हैराण झालेले नागरिकच नव्हे, तर मुक्या जनावरांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. (Dairy Farming Innovation)

विशेषतः म्हशींना उष्णतेचा त्रास अधिक जाणवत असल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. (Dairy Farming Innovation)

या पार्श्वभूमीवर हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवत आपल्या म्हशींसाठी चक्क स्विमिंग पूल उभारला आहे.(Dairy Farming Innovation)

दुग्धव्यवसायात ५० वर्षांचा अनुभव

रामेश्वर मांडगे हे गेल्या जवळपास ५० वर्षांपासून दुग्धव्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या गोठ्यात सध्या ८० मोठ्या आणि ३० लहान म्हशी असून दररोज ४०० ते ४५० लिटर दूध उत्पादन घेतले जाते.

त्यांच्या या व्यवसायात संपूर्ण कुटुंबाचा सक्रिय सहभाग असून नियोजनबद्ध कामकाजामुळे त्यांनी या क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडूनही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

उष्णतेवर मात करण्यासाठी 'स्विमिंग पूल'

वाढत्या तापमानामुळे म्हशींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन मांडगे यांनी आपल्या गोठ्यात एक प्रशस्त स्विमिंग पूल बांधला आहे.

या पूलमध्ये म्हशी आरामात बसू शकतील इतकी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पूल परिसरात थंड पाण्याचे शॉवर बसवण्यात आले असून त्यामुळे म्हशींना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळत आहे.

'वॉटर पार्क'चा अनुभव

या पूलमुळे म्हशींना जणू 'वॉटर पार्क'चा अनुभव मिळत आहे. पशुतज्ज्ञांच्या मते, म्हशींची त्वचा काळी असल्याने त्या उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे तापमान जास्त वाढल्यास त्यांचे दूध उत्पादन घटते, तसेच गाभण म्हशींमध्ये गर्भपाताचा धोका वाढतो. या सर्व बाबींचा विचार करून मांडगे यांनी हा अभिनव प्रयोग राबवला आहे.

दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम

या स्विमिंग पूलमुळे म्हशींच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम दूध उत्पादनावरही दिसून आला आहे.

उष्णतेमुळे दूध घटण्याची समस्या कमी झाली असून उत्पादन स्थिर राहण्यास मदत होत आहे.

इतरांसाठी प्रेरणादायी उपक्रम

मांडगे यांचा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून इतर पशुपालकांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे. जनावरांची योग्य काळजी आणि आधुनिक उपाययोजना यांचा संगम साधल्यास दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

वाढत्या उष्णतेच्या संकटात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हिंगोलीतील या शेतकऱ्याने उचललेले पाऊल हे केवळ अभिनवच नाही, तर इतरांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

जनावरे बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही वेदना होतात. कडक उन्हामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही स्विमिंग पूल आणि थंड पाण्याचे शॉवर बसवले. त्यामुळे म्हशींना मोठा दिलासा मिळतो आणि दूध उत्पादनही स्थिर राहते.- रामेश्वर मांडगे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Animal Heatwave Care : उष्णतेत पशुधनाचे रक्षण कसे कराल? 'हे' उपाय ठरतील जीवनदायी

अधिक वाचा : Gas New Rules Update : १ मेपासून गॅस मिळवणं सोपं नाही; 'हे' नवे नियम जाणून घ्या

English
हिंदी सारांश
Web Title : Innovative farmer builds swimming pool for buffaloes to beat the heat.

Web Summary : Facing extreme heat, a farmer in Hingoli, Rameshwar Mandge, built a swimming pool for his buffaloes. This innovative approach helps maintain milk production and keeps the animals healthy, inspiring other dairy farmers in the region. The pool offers relief and maintains milk output.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीदुग्धव्यवसाय